पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १२- ताम्हिणी घाटात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीलाच पोलिसांनी घातपात असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करत दोन आरोपींना माणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
तालुक्यातील पुणे दिघी महामार्गावर असलेल्या ताम्हिणी घाटातील मौजे सणसवाडी गावच्या हद्दीतील सीक्रेट पॉईंट जवळ दि. ११ जानेवारी रोजी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. फिर्यादी हे जागा दाखविण्यासाठी गेले गेले असता २५ ते ३० वर्षे, वयोगटातील पुरुष निपचिप अवस्थेत पडलेला दिसून आला. तत्काळ त्यांनी माणगाव पोलिसांना संपर्क साधला असता माणगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मयत इसमाच्या अंगावर डाव्या बाजुच्या खांदयाच्या खाली, गळ्याला व डोक्याला जखमा झालेल्या दिसल्या. तसेच जमिनीवर सुखलेल्या रक्ताचे डाग दिसले. परंतु, सदर व्यक्तीची ओळख पटत नव्हती. मयत इसमाच्या अंगावरील खुणा पाहून घातपात असल्याचा संशय पोलिसांनी आला. त्यानुसार माणगाव पोलिसांनी शोध घेऊन पुणे येथून आरोपी अनिकेत महेश वाघमारे, वय २६ आणि तुषार उर्फ सोन्या शरद पाटोळे, वय २४, वर्ष, दोन्ही रा. पुणे यांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत.


































