पोलीस प्रवाह न्युज
धाराशिव, दि. १७- आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ३ मधे पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे सर्वसाधारण पुरुष आणि अनुसूचित जातीसाठी महिला उमेदवार उभे करणार असल्याचे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी जाहीर केले आहे.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये पोलीस लाईन मध्ये राहणारे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सुमारे १५०० ते १८०० मतदान असल्यामुळे या प्रभागात पोलीस बॉईज असोसिएशनच्या उमेदवाराला पोलीस परिवार मोठ्या संख्येने मतदान करतील असा विश्वास प्रमोद वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.
गेली १५ वर्षांपासून पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून प्रमोद वाघमारे हे पोलीसांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी सतत लढा देत असल्यामुळे पोलीस लाईन मध्ये राहणारे पोलीस परिवारातील सदस्य त्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. त्याच प्रमाणे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी संघटनेने देखील प्रमोद वाघमारे यांना पाठिंबा जाहीर केला असून पोलीस बॉईज असोसिएशनच्या उमेदवाराला मोठ्या संख्येने निवडून आणणार असल्याचे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी सांगितले आहे.
त्याच प्रमाणे प्रमोद वाघमारे वाघमारे यांचे प्रभाग क्रमांक ३ मधील सर्व कुटुंबातील व्यक्तींसोबत जिव्हाळ्याचे संबंध असून समाजात यांची प्रतिमा अतिशय चांगली असल्याने तसेच त्यांचा जनसंपर्क मोठा असल्याने प्रभागातील मतदार हे नक्कीच पोलीस बॉईज असोसिएशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे देखील बोलले जात आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील सर्व मतदारांनी पोलीस बॉईज असोसिएशनच्या उमेदवारांना सहकार्य करावे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन प्रमोद वाघमारे यांनी केले आहे.




































