पोलीस प्रवाह न्युज
लाटवण/मंडणगड, दि. ३०- तालुका तहसिल कार्यालयचे कोषागार सहाय्यक महसूल अधिकारी शिवाजी बिच्चेवार हे दि. ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी मंडणगड तालुक्यासह इतर ठिकाणी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ पेंशन योजना, दिव्यांग पेंशन योजना, या खात्यांच्या प्रमुख पदावर त्यांनी पदभार सांभाळला. शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर यांनी आज दिनांक ३० जून रोजी मंडणगड तहसिल कार्यालय येथे जाऊन शिवसेना मंडणगड तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार केला. जे सहकार्य तालुक्यातील नागरीकांना केले त्या बद्दल त्यांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले.

यावेळी सेवाभावी सरकारी अधिकारी शिवाजी बिच्चेवार यांच्या सत्कार व आभार व्यक्त कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र शासन गृहराज्यमंत्री ना.योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मंडणगड तालुका शिवसेना महिला समन्वयक अस्मिता केंद्रे, शिवसेना शिरगांव गण विभाग प्रमुख ईरफान भाई बुरोंडकर, शिवसेना शहर प्रमुख न. पं. गटनेता नगरसेवक विनोद जाधव, शिवसेना देव्हारे विभाग संघटक निलेश रक्ते, शिंदे गुरुजी, कार्यालय प्रमुख संतोष पार्टे, माजी सरपंच किशोरजी दळवी, शिवसेना सचिव सिध्देश देशपांडे, निलेश महाडिक, निवृत्त पोलिस उपायुक्त रमेश घडवले, सुभाष भागडे, तसेच मंडणगड तालुक्यातील विविध विभागातील शिवसैनिक उपस्थित होते. यांनी सर्वांनी निवृत्त कोषागार सहा. महसूल अधिकारी बिच्चेवार यांना शुभेच्छा देऊन पुढील निरोगी व दीर्घायुष्य वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

































