पोलीस प्रवाह न्युज
“गुन्हेगार म्हणजे रुग्ण, गुन्हा म्हणजे रोग आणि शिक्षा म्हणजे त्या गुन्हेगाराला बरे करणारे औषध.”
समाज म्हणजे जिवंत शरीर. प्रत्येक नागरिक म्हणजे त्या शरीरातील पेशी, तर कायदे, आरोग्य व नैतिक मूल्यं म्हणजे त्याच्या जीवनरसाची नाड्या. जेव्हा एखादी पेशी बिघडते, तेव्हा जशी ती शरीराला दुखवते; तसाच एक गुन्हेगार संपूर्ण समाजात अस्थिरता / दहशत निर्माण करतो. गुन्हेगारी ही केवळ कायद्याचा भंग करणारी कृती नसून ती व्यक्तीच्या मानसिक, सामाजिक व नैतिक अवस्थेचे प्रतिबिंब असते. “गुन्हेगार म्हणजे व्यक्ती, गुन्हा म्हणजे रोग आणि शिक्षा म्हणजे उपाय” —ही संकल्पना क्रिमिनल लॉच्या सुधारवादी विचारसरणीचा (Reformative Theory) गाभा आहे. ही भूमिका गुन्हेगाराकडे केवळ दोषारोपाच्या दृष्टिकोनातून न पाहता, मानवतेच्या आणि समजुतीच्या दृष्टीने पाहण्याची शिकवण देते.
“समाज” या नावाने एक मानवी शरीराची रूपरेखा म्हणता येईल तर “गुन्हा” या नावाने रोगाचे ठिपके तर “कायदा” / मॅजिस्ट्रेट म्हणून डॉक्टर तर “शिक्षा” म्हणून औषध म्हणता येईल तर ” जेल म्हणून दवाखाना संबोधता येईल.
मानवी शरीर घटक (Human Body) व कायदेव्यवस्था (Legal System) यांची तुलना पाहिली तर “कायदा व्यवस्था ही मानवी शरीरासारखी कार्य करते.” ( Legal System is like a Human Body ) :-
केंद्र मेंदू (Brain) म्हणजे सार्वभौम (Sovereign ) / न्यायसंस्था . रक्तप्रवाह परिसंचरण (Circulation) म्हणजे
कायदा . मज्जातंतू (Nerves) म्हणजे कायद्याचा अंमल (Implementation) . हृदय ( Heart ) म्हणजे भावना , जीवनशक्ती ( Immune system) म्हणजे नैतिकता, न्याय ,
रोग दोष / विकार ( Disease ) म्हणजे भ्रष्टाचार, अन्याय ( curruption, Injustice ). चिकित्सा – वैद्यकशास्त्र म्हणजे दंडशास्त्र, सुधारणा इ .
तसेच आयुर्वेद आणि क्रिमिनल लॉ तुलना पाहता –
आयुर्वेद – दोष (वात, पित्त, कफ) बिघाड तर क्रिमिनल लॉ – मानसिक दोष, नैतिक बिघाड .
विकृती / आजार तर Crime = गुन्हा
शरीर = रुग्ण तर Criminal = रुग्ण
उपचार = औषध, आहार, दिनचर्या तर Punishment = सुधारणा, समुपदेशन , शिक्षण
दोघांचे ही उद्दिष्ट = शरीर संतुलन तर पुनर्सामाजिककरण होय .
फ्रेंच न्यायाधिश एक महान तत्वज्ञ Montesquieu ने मानवी शरीरावर थेट वैद्यकीय मत दिले नाही. पण “मानवी निसर्ग” (Human Nature) व “शरीराची संवेदनशीलता” यावरून कायदे समाजात कसे लागू करावेत हे स्पष्ट केले. वातावरण, हवामान व समाजरचना याचा मानवी वर्तनावर परिणाम होतो — हे Montesquieu ने मानले. आयुर्वेद कार्यकारण भाव सिद्धांत रोगाच्या मूळ कारणांवर भर देतो. Montesquieu मानवी वर्तनाचा अभ्यास करून कायदे योग्य रचावेत असे सुचवतो. दोघांचे विचार वेगळ्या प्रणालीतील असले तरी — मूल कारण, संतुलन व परिणाम यांचा अभ्यास हे त्यांचे साम्य आहे.
मानवी जीवन हे दोन महत्त्वाच्या आधारस्तंभांवर उभे आहे – शरीर आणि समाज. शरीरातील आरोग्य टिकवण्याचे कार्य डॉक्टर करतात, तर समाजातील कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचे कार्य पोलीस यंत्रणा व मे कोर्ट करतात. दोन्हींचा उद्देश एकच आहे – शरीर व समाजात आनंद, सुख निर्माण करणे आणि समतोल राखणे.या दोन्ही क्षेत्रांना दिशा देणारी दोन मूलभूत तत्त्वे – “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” – सद्गुणींचे रक्षण आणि दुष्टांचे दमन. “सत्यमेव जयते” – सत्यच विजय मिळवते.
मानवी शरीर आणि कायद्याचा संबंध कसा?
मानवी शरीर आणि कायद्याचा संबंध समजावून सांगायचा तर तो आयुर्वेदातील शरीर-रोग-औषध आणि न्यायशास्त्रातील समाज-गुन्हा-शिक्षा या त्रिकुटाशी खूप साधर्म्य दाखवतो.
1. शरीर : म्हणजे समाज
मानवी शरीरात वेगवेगळे अवयव एकत्र काम करतात, तसंच समाजातील व्यक्ती, संस्था आणि व्यवस्था एकत्र काम करतात. शरीराला जसा समतोल (होमिओस्टॅसिस) लागतो, तसाच समाजाला न्याय आणि सुव्यवस्था लागते.
गुन्हेगार म्हणजे एक व्यक्ती (Criminal is a Person): आसून गुन्हा करणारा हा दैत्य नसून तो एक व्यक्ती आहे, जो विशिष्ट परिस्थिती, दबाव, अन्याय, गरिबी, वा मानसिक तणावामुळे गुन्ह्याच्या मार्गावर गेला असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये सुधारण्याची क्षमता असते. बालगुन्हेगार, मानसिक आजार असलेले आरोपी, गरिबीमुळे चोरी करणारे – यांच्याकडे दया व समजुतीने पाहणे आवश्यक आहे.
2. रोग : म्हणजे गुन्हा
शरीरात एखादा रोग झाला तर तो संपूर्ण आरोग्य बिघडवतो. समाजात गुन्हा हा तसाच रोग आहे — तो समाजातील नैतिक व कायदेशीर आरोग्य बिघडवतो. जसा वात-पित्त-कफ यांचा असंतुलन शरीरात रोग निर्माण करतो, तसाच लोभ, क्रोध, मोह, द्वेष हे मानसिक दोष गुन्ह्याचं मूळ कारण ठरतात. गुन्हा म्हणजे रोग (Crime is a Disease) आसून रोग जसा शरीरात दोषांमुळे होतो, तसाच गुन्हा हा समाजातील दोषांमुळे निर्माण होतो. आर्थिक विषमता, सामाजिक अन्याय, शिक्षणाचा अभाव, नैतिकतेचे अधःपतन ही गुन्ह्याची प्रमुख कारणे आहेत.काही गुन्हे मानसिक विकारांमुळे, काही परिस्थितीजन्य असतात. म्हणूनच गुन्हा हा केवळ दंडनीय नाही, तर उपचारयोग्य आहे.
3. वैद्य (डॉक्टर ) म्हणजे न्यायव्यवस्था (पोलिस यंत्रणा ) / मे .कोर्ट
शरीरात रोग ओळखून उपचार करणारा डॉक्टर जसा असतो, तसा समाजात गुन्हा ओळखून योग्य उपाय करणारा न्यायाधीश किंवा कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था असते.वैद्य शरीराचे संतुलन राखतो तर न्यायव्यवस्था समाजाचे संतुलन राखते. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जसे “Medical Ethics” आहेत, तसेच न्यायालयात “Judicial Ethics” असतात.
वैद्य (डॉक्टर) म्हणजे न्यायव्यवस्था ( पोलिस यंत्रणा ) व मे .कोर्ट – एक साम्य व अभ्यास पाहता – भारतीय संस्कृतीत “आरोग्य” आणि “सुव्यवस्था” हे दोन आधारस्तंभ मानले जातात. शरीरासाठी वैद्य जसा अत्यावश्यक असतो, तसाच समाजासाठी न्यायव्यवस्था ( मे .कोर्ट / पोलिस यंत्रणा) आवश्यक आहे. या दोन्ही यंत्रणांचा उद्देश एकच — समतोल राखणे व दोषांचे निवारण करणे.
A) निदान आणि परीक्षण-
वैद्य रुग्णाची तपासणी करून त्याच्या आजाराचे लक्षणे व मूळ कारण शोधतो. त्याचप्रमाणे कोर्ट पुरावे, साक्षी व कागदपत्रे तपासून वाद किंवा गुन्ह्याचे मूळ कारण शोधते. निदान अचूक झाले तरच योग्य उपचार/निर्णय शक्य होतो.
B) मूळ कारण शोधणे-
आयुर्वेदात कार्यकारण भाव महत्त्वाचा आहे —परिणाम मागील कारणावर अवलंबून असतो. वैद्य रोगाचे मूळ कारण (आहार, जीवनशैली, संक्रमण) शोधतो. न्यायव्यवस्था देखील गुन्ह्याच्या मूळ कारणांवर (परिस्थिती, हेतू, सामाजिक पार्श्वभूमी) लक्ष देते.
C) उपचार व निर्णय –
वैद्य औषधोपचार, शल्यक्रिया किंवा जीवनशैली सुधारणा सुचवतो. कोर्ट दोषींना शिक्षा देते, निरपराधांना मुक्त करते किंवा समेटाचा मार्ग दाखवते. उपचार व निर्णय दोन्हीचा उद्देश संतुलन पुनर्संचयित करणे हाच असतो.
D) प्रतिबंधात्मक भूमिका-
वैद्य रुग्णांना रोग टाळण्यासाठी लसीकरण, स्वच्छता व योग्य आहार यांचा सल्ला देतो. कोर्ट देखील गुन्हे टाळण्यासाठी कायदे बनवते, जनजागृती करते आणि अंमलबजावणी यंत्रणांना दिशा देते.
E ) सामाईक ध्येय
दोघांचेही ध्येय “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” — सज्जनांचे रक्षण करणे आणि दुष्टांचे दमन करणे.
वैद्य शरीराचे आरोग्य राखतो, कोर्ट समाजाचे आरोग्य (सुव्यवस्था व न्याय) राखते.
आता आपल्या लक्षात आले असेल -शरीरातील रोग म्हणजे समाजातील गुन्हा व वैद्याचा उपचार म्हणजे कोर्टाचा निर्णय आणि रोगप्रतिकारशक्ती म्हणजे कायदा अंमलबजावणी यंत्रणा.
4. औषध : म्हणजे शिक्षा .
डॉक्टर रोग बरा करण्यासाठी औषध देतो — कधी सौम्य, कधी कडक. न्यायव्यवस्था गुन्हेगाराला शिक्षा देते — कधी सौम्य (सुधारणा), कधी कडक (कारावास/दंड).शिक्षा म्हणजे उपाय (Punishment is a Remedy) आसुन परंपरागत पद्धतीत शिक्षा ही बदला घेण्याची प्रक्रिया मानली जाते.भारतीय घटनेचा दृष्टिकोनातून पाहता – अनुच्छेद २१ – जीवनाचा व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क – प्रत्येक व्यक्तीला लागू होतो, अगदी गुन्हेगारालाही.
न्यायालयांनी वेळोवेळी सांगितले आहे की, “शिक्षेचा उद्देश सुधारणा असावा, फक्त सूड नव्हे.”
त्यामुळे गुन्हेगाराला वैद्यकीय, मानसिक व सामाजिक मदतीची आवश्यकता असते. त्यामळेच सद्यःस्थितीत आधुनिक दृष्टीकोनातून शिक्षा म्हणजे पुनर्वसन, समुपदेशन, शिक्षण आणि आत्मचिंतन होय .जेल हे केवळ शिक्षा देण्याचे ठिकाण नसून, ते सुधारणागृह म्हणजेच सामाजिक आरोग्य केंद्र असावे. योग, ध्यान, शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण यामुळे कैद्यांचे पुनरुत्थान शक्य होते. म्हणजे उद्देश समान: – आरोग्य परत आणणे — शरीराचे किंवा समाजाचे.
आजकाल, न्यूरोबायोलॉजीच्या माध्यमातून मानवी वर्तन, गुन्हेगारी प्रवृत्ती याचे विश्लेषण केले जाते.
उदा. Impulse Control Disorders → Crime → Legal Responsibility.
हा दृष्टिकोन सुधारात्मक न्यायव्यवस्था (Rehabilitative Justice) या संकल्पनेशी जोडलेला आहे, ज्यामध्ये शिक्षेचा उद्देश फक्त शिक्षा देणे नसून गुन्हेगाराचे सुधारणे हा असतो.
म्हणून “न्याय केवळ शिक्षा करत नाही, तो बरेही करतो” .शिक्षा ही सूडाची नाही, सुधारण्याची प्रक्रिया आसली पाहिजे.शिक्षेचा उद्देश -आत्मपरीक्षण, पश्चाताप, वर्तनपरिवर्तन.
“दंड तोच श्रेष्ठ जो रुग्णपणाला नाहीसे करतो.”
5. कार्यकारण भाव (Cause–Effect)
आयुर्वेदात रोग होण्यासाठी कारण शोधून त्यावर उपचार करतात. न्यायशास्त्रात गुन्ह्याचे मूळ कारण शोधून त्यावर उपाय करणे महत्त्वाचे.
आजून विशेष स्पष्टीकरण पहायचे झाल्यास –
प्रत्येक मानवशरीर हा कायद्यानुसार एक “legal person” मानला जातो. Fundamental Rights — Right to Life, Right to Privacy, Right to Dignity — हे सर्व मानवी शरीराशी संबंधित आहेत .
भारतीय राज्यघटना आणि आरोग्यनिष्ठ दृष्टीकोन
अनुच्छेद २१ – प्रत्येक व्यक्तीला जीवनाचा आणि प्रतिष्ठेचा हक्क आहे. म्हणून
न्यायपालिका वेळोवेळी सांगते की, शिक्षा म्हणजे केवळ शारीरिक वेदना नव्हे, ती एक मूल्याधिष्ठित प्रक्रिया असावी. त्यामुळे न्यायालये अनेक वेळा रिफॉर्मेटिव्ह पनिशमेंट (Reformative Approach) वर भर देतात.
म्हणजे मानवी शरीराच्या कार्यपद्धतीप्रमाणेच एक आदर्श कायदेव्यवस्था हवी — जी “तर्क” (Analytical), “न्यायपूर्ण” (Just), आणि “मानवकेंद्री” (Human-centric) असेल.
Analytical School आपल्याला कायद्यातील शरीररचनात्मक पद्धती शिकवते.
Natural Law आपल्याला त्याचे नैतिक हृदय देते. Social Jurisprudence आपल्याला त्याचे सामाजिक नाड्या ओळखून देते.
“गुन्हा हा रोग आहे, गुन्हेगार हा आजारी माणूस आहे, आणि शिक्षा म्हणजे उपचार” ही संकल्पना न्याय, करुणा आणि मानवी मूल्ये यांची सांगड घालते. एक आदर्श समाज तोच जो रुग्णाला फेकून देत नाही, तर त्याचे उपचार करतो. ज्याप्रमाणे आरोग्य टिकवण्यासाठी शरीरातील दोष शोधून औषध दिले जाते, तसाच समाजही गुन्हेगारातील “मानव” शोधून त्याला योग्य दिशा देतो, हीच “आरोग्याचे संविधान” या ग्रंथाची मूलमूल्ये आहेत .
✍️ लेखक: डॉ. आनंद गोरख मोरे
पात्रता: एम.डी. (आयुर्वेद), योग शिक्षक , एलएल.बी. ( चालू ), राजर्षी शाहू लॉ कॉलेज बार्शी . आयुष वैद्यकीय अधिकारी (कंत्राटी )ग्रंथ लेखक – आरोग्यामृत व आरोग्याचे संविधान ग्रंथ . मो . नं .9423066291


































