पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव ; दि २६ – सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविणाऱ्या राष्ट्र सेविका समिती अरुंधती शाखा माणगाव यांच्या मार्फत पर्यावरण जतन व संवर्धन करण्यासाठी बुधवार दिनांक २५ जून रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पर्यावरण जतन व संवर्धनाचा संदेश देते भादव, समता नगर हॉल, विंचवली या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पेरू , सीताफळ , जांभूळ , कांचन , आपटा , करंज या सारख्या पर्यावरण पूरक वृक्ष लागवड करण्यात आले. व वृक्ष संगोपनाची प्रतिज्ञा करण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमास श्रीमती वैद्य , मंगल मेहता , स्वामिनी पिसाट, स्वरुपा मेहता , साक्षी कामत , योगिता शेट, भारती महाळुंगे,मेधा गोडबोले , मनीषा जोशी, रेखा बिरवाडकर, मानसी गोडसे, आर्या काळे, कामत व बाल सेविका आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.





































