पोलीस प्रवाह न्युज
आपल्या समाजात तीन व्यवसाय असे आहेत, ज्यांच्यावर लोकांचा सर्वात जास्त विश्वास असतो — डॉक्टर, वकील आणि पोलीस. हे तिन्ही समाजाच्या आरोग्य, न्याय आणि सुरक्षिततेचे आधारस्तंभ आहेत.डॉक्टर शरीर वाचवतो, वकील न्याय मिळवून देतो, आणि पोलीस समाजात शिस्त राखतो. मात्र या तिन्ही क्षेत्रांमध्ये आज वाढता व्यावसायिक दृष्टीकोन आणि नैतिकतेचा अभाव जाणवतो आहे. म्हणूनच या क्षेत्रांना पुन्हा “सेवा आणि सदाचार” या मूलभूत मूल्यांकडे वळविण्याची आज निकड आहे.
भारतीय संस्कृतीतील त्रिवेणीचे तत्त्व
भारतीय संस्कृती ही “सर्वे भवन्तु सुखिनः” या विचारावर उभी आहे. आपल्या आचारधर्मात समाजातील प्रत्येक व्यक्ती ही धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांच्या संतुलनात जगते. या चार पुरुषार्थांचे संरक्षण करण्यासाठी तीन महत्त्वाचे आधारस्तंभ निर्माण झाले. वकील, डॉक्टर आणि पोलीस. हे तिन्ही व्यवसाय स्वतंत्र असूनही, त्यांचा मूळ उद्देश एकच आहे — “दुखींचे रक्षण, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि सत्याची प्रतिष्ठा.”
भारतीय संस्कृती दृष्टिकोन
आपल्या संस्कृतीत “धर्म” हा केवळ धार्मिक कर्मकांड नव्हे, तर न्याय, आरोग्य आणि शिस्त या तिन्हींचे एकत्रित रूप आहे.“धर्मो रक्षति रक्षितः” — म्हणजेच जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे धर्म रक्षण करतो. वकील, डॉक्टर आणि पोलीस हे या धर्मरक्षणाचे तिन्ही स्तंभ आहेत.
1. वकील – न्यायधर्माचे रक्षक (न्यायमार्गाचा रक्षक)
2. डॉक्टर – आरोग्यधर्माचे रक्षक (जीवनसंवर्धक)
3. पोलीस – सामाजिक धर्माचे रक्षक (शिस्त आणि सुरक्षेचे संवर्धक)
हे तिन्ही “सदाचार, प्रामाणिकपणा आणि करुणा” या तीन गुणांनी ओतप्रोत असावेत, तेव्हाच धर्माचा खरा अर्थ जिवंत राहतो. वकील : न्यायाचे रक्षक, पण पारदर्शकतेची गरज वकिली व्यवसाय हा Public Service आहे — Business नव्हे. वकीलाचे पहिले कर्तव्य म्हणजे न्यायालयाला सहाय्य करणे आणि पीडित व्यक्तीस न्याय मिळवून देणे. परंतु अनेकदा फीबाबत अस्पष्टता व पारदर्शकतेचा अभाव यामुळे पक्षकारांचा विश्वास कमी होतो. वकिलांनी फी दरपत्रक कार्यालयात लावावे. क्लायंटला फीचे कारण स्पष्ट सांगावे. गरीब घटकांसाठी Legal Aid System सक्षम करावी. शासनाने प्रोफेशनल मिसकन्डक्ट विरोधात स्वतंत्र तक्रारव्यवस्था निर्माण करावी -तक्रारीसाठी व इतर मदतीसाठी बार कौन्सिलचा ईमेल आयडी व टोल फ्री नंबर दर्शनीय भागामध्ये लावावे . न्याय ही विक्रीची वस्तू नाही, ती समाजातील संतुलन राखणारी शक्ती आहे. वकील न्यायाचा साधक आसून हा केवळ युक्तिवाद करणारा नसतो, तर तो सत्य आणि न्यायाचा दूत असतो.
मनुस्मृतीनुसार — “सत्यं वद धर्मं चर” — सत्य बोला, धर्म आचरा. वकिलाने क्लायंटला दिशाभूल न करता, त्याला सत्याचा मार्ग दाखवणे हेच त्याचे धर्मकर्म आहे. फी ही त्याच्या ज्ञानाची किंमत आहे, पण न्याय विक्रीची वस्तू नाही. न्याय हा समाजाचा प्राण आहे, आणि वकील हा त्या प्राणाचा श्वास.
डॉक्टर : आरोग्यसेवेतील माणुसकी
डॉक्टर हा जीवनाचा रक्षक असतो. मात्र काही ठिकाणी उपचारांपेक्षा बिल मोठे दिसते; अनावश्यक तपासण्या व औषधोपचारांमुळे रुग्णांचा विश्वास ढासळतो. म्हणून — हॉस्पिटलमध्ये दरपत्रक व “रुग्ण हक्कपत्र” लावणे बंधनकारक असावे. चुकीच्या उपचारांविषयी Medical Grievance Cell कार्यक्षम करावी. रुग्ण-डॉक्टर संवाद सुधारण्यासाठी विश्वासावर आधारित सल्ला प्रणाली विकसित करावी. डॉक्टर जर रुग्णाला “देवाचे रूप” मानतील, तर त्यांचा व्यवसाय पुन्हा “सेवा” बनेल, “व्यवसाय” नव्हे. डॉक्टर – आयु: संवर्धन करणारा देवदूत आयुर्वेदात म्हटले आहे.“हिताहितं सुखं दुःखं आयुर् नित्यम् च तच्छ यः।” (जो जीवनाचे हित- अहित जाणतो, तोच खरा वैद्य.) डॉक्टराचे कार्य म्हणजे देहाचे नव्हे तर प्राणाचे रक्षण. तो फक्त औषध देत नाही, तर आशा देतो. जर डॉक्टर माणुसकीने आणि सेवाभावाने रुग्णाकडे पाहिला, तर तो स्वतः “धर्मोपासक” बनतो. मात्र व्यावसायिक लोभामुळे उपचार सेवा झाली तर ती अधर्मरूप ठरते. रुग्ण हे डॉक्टर सहज बदलू शकतात मात्र क्लाइंटला वकील बदलण्याची प्रोसिजर माहिती नसते त्याबद्दल प्रत्येक न्यायालयाचे आवारात माहिती दर्शनीय भागी लावावी . डॉक्टर आणि वकील यांचा व्यवसाय नव्हे, ती एक पवित्र सेवा आहे :-
वकीलांचे प्राथमिक कर्तव्य म्हणजे सार्वजनिक सेवा (Public Service) होय. न्यायालयाला मदत करून पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देणे हेच त्यांचे सर्वोच्च कर्तव्य आहे. त्यांचा व्यवसाय “Law is not a trade, but a profession” या विचारावर आधारित आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांचे जीवन ‘आरोग्यसेवा’ या पवित्र ध्येयावर आधारित आहे. त्यांनी रुग्णाला देवाचे रूप समजून त्याची सेवा करणे हे आपले धर्मकर्म मानले आहे. चरकसंहितेत सांगितले आहे. “न हि सर्वं विद्या फलति न च सर्वं औषधं हितम् न च सर्वे चिकित्सां कुर्वन्ति – सत्त्ववान् चिकित्सकः॥” म्हणजेच ज्ञान, औषधं वा तंत्र यापेक्षा सत्त्वशील व नैतिक वृत्तीचा डॉक्टर हाच खऱ्या अर्थाने उपचारक ठरतो . व्यावसायिक आचारसंहिता (Professional Code of Ethics) वकीलांसाठी – बार कौन्सिल ऑफ इंडियाने निश्चित केलेली Advocate’s Code of Conduct प्रत्येक वकिलाने पाळावी. त्यात “accepting work from touts is totally prohibited” असे स्पष्ट नमूद आहे. याचा अर्थ – कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर माध्यमातून काम मिळवणे किंवा न्यायव्यवस्थेचा गैरवापर करणे हे निषिद्ध आहे.
डॉक्टरांसाठी – भारतीय वैद्यकीय परिषद (Medical Council of India) ने तयार केलेली Code of Medical Ethics सांगते की, “Patient welfare shall be the first consideration.” त्यामुळे डॉक्टरांनी लाभाच्या मोहापेक्षा रुग्णकल्याणाला प्राधान्य द्यावे.
नैतिक अधःपतन (Moral Turpitude) म्हणजे काय?
Moral Turpitude म्हणजे असे कृत्य जे समाजाच्या नैतिक मूल्यांना, प्रामाणिकपणाला व सदाचाराला विरोध करणारे असते. हे कृत्य अनैतिक, बेईमानीचे, भ्रष्ट किंवा लज्जास्पद मानले जाते.
उदा. — लाच घेणे, पुरावा बनावट करणे, खोटे साक्षी देणे, रुग्णाच्या विश्वासाचा गैरवापर करणे, न्यायालयास खोटे दिशादर्शन करणे इत्यादी. अशी कृती केवळ व्यक्तीचेच नव्हे, तर संपूर्ण व्यवसायाचे सार्वजनिक विश्वासावरचे अधिष्ठान (Foundation of Trust) ढासळवते.
🔹 नैतिक अधःपतनाचे सामाजिक परिणाम
1. विश्वासाचा ऱ्हास — डॉक्टरांवरील आणि वकिलांवरील लोकांचा विश्वास कमी होतो.
2. संविधानिक मूल्यांचे दुर्बलन — न्याय, समता व बंधुता या तत्त्वांना धक्का बसतो.
3. न्याय व आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्टाचार वाढतो.
4. सेवेचा भाव कमी होऊन स्पर्धेचा व नफ्याचा भाव वाढतो.
संविधानिक व आध्यात्मिक दृष्टिकोन
भारतीय संविधानातील मौलिक कर्तव्ये (Fundamental Duties) कलम 51A मध्ये नमूद आहेत. त्यात नागरिकांनी “उच्च नैतिक आदर्शांचे पालन करावे” असे म्हटले आहे. योगसूत्रातील यम-नियम आणि आयुर्वेदीय ‘सत्त्वगुण’ हे देखील त्याचाच प्रतिबिंब आहेत.
सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ही केवळ योगसाधकांची नव्हे, तर डॉक्टर आणि वकिलांचीही व्यावसायिक नीती असावी. डॉक्टर आणि वकील या दोन्ही व्यावसायिकांनी आपल्या कार्यात सेवा, सत्य आणि सदाचार या त्रिसूत्रीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे. त्यांची जबाबदारी केवळ ग्राहक वा रुग्णापुरती मर्यादित नसून, ती समाज, संविधान आणि राष्ट्राच्या हितासाठी आहे.
“Profession of Honour is not a private gain, but a Public Good.”
ही ओळ लक्षात ठेवून प्रत्येक डॉक्टर आणि वकील जर आपल्या अंतःकरणाशी प्रामाणिक राहिला, तर भारतात “आरोग्यदायी न्याय आणि न्याययुक्त आरोग्य” यांची सुवर्णयुगीन परंपरा निर्माण होईल.
पोलीस : कायद्याचे रक्षक आणि समाजाचे संरक्षण
पोलीस म्हणजे समाजातील “जिवंत संविधान”. त्यांचे काम गुन्हे रोखणे, तपास करणे आणि शांतता राखणे हे आहे. परंतु भ्रष्टाचार, पक्षपात आणि दबाव यामुळे लोकांचा विश्वास कमी होतो. पोलीस – समाजधर्माचे रक्षक भारतीय संस्कृतीत राजाला आदेश आहे. “राजा धर्मेण भूमिं पालयेत्” — राजा धर्माने भूमीचे रक्षण करावा. आजच्या काळात हा राजधर्म पोलिसांवर अवलंबून आहे. त्यांनी भीती निर्माण करण्याऐवजी सुरक्षिततेची भावना निर्माण केली. तर समाजात शांतता नांदते. त्यांनी न्यायप्रक्रियेत प्रामाणिक भूमिका घेतली, तर लोकांचा कायद्यावरील विश्वास वाढतो. म्हणून —प्रत्येक ठाण्यात Citizen Rights Board लावणे आवश्यक आहे.FIR दाखल न केल्यास दंडात्मक कारवाई व्हावी. “ई-चार्जशीट व ई-एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टीम” कायदा सुधारणा प्रस्ताव सादर करण्याबाबत.
http://healthconstitution007.blogspot.com/2025/09/blog-post_25.html
पोलीस, वकील आणि न्यायालय यांच्यात समन्वय प्रणाली विकसित करावी. नैतिक अध:पतन आणि मानवतेचा अपराध Moral Turpitude म्हणजे समाजाच्या नैतिक मूल्यांना विरोध करणारे वर्तन. डॉक्टर जर उपचार विकतात, वकील जर न्याय विकतो, आणि पोलीस जर कायदा विकतो. तर ते केवळ व्यावसायिक चुकाच नव्हे, तर मानवतेचा अपराध ठरतो. त्रिवेणीचे नैतिक अधिष्ठान : Moral Turpitude वरील संस्कृतीचा दृष्टिकोन “Moral Turpitude” म्हणजे नैतिक अधःपतन -पण भारतीय संस्कृती त्याला “अधर्म” म्हणते. जो वकील न्याय विकतो, डॉक्टर उपचार विकतो, किंवा पोलीस सत्य विकतो — तो अधर्माचा प्रतिनिधी ठरतो. असा अधर्म केवळ व्यक्तीचे नाही, तर समाजाचे पतन घडवतो. एकत्रित जबाबदारी – न्याय, आरोग्य आणि सुरक्षिततेचा संगम या तिन्ही क्षेत्रांनी एकत्रित काम केल्यास समाजात मोठा बदल घडू शकतो.
उदा. — लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसा, अपघात, फसवणूक अशा प्रकरणांत
Doctor–Lawyer–Police Coordination System उपयुक्त ठरेल. शासनाने “सामाजिक न्याय सेवा केंद्रे” उभारावीत, जिथे लोकांना आरोग्य, कायदा आणि सुरक्षा सेवा एकाच ठिकाणी मिळतील.
समाजधर्माचे पुनरुज्जीवन
आजची सर्वात मोठी गरज आहे — “व्यवसाय नव्हे, सेवा हा धर्म आहे” या भावनेचे पुनरुज्जीवन. शासनाने आणि समाजाने मिळून न्याय, आरोग्य व सुरक्षा या क्षेत्रांतील पारदर्शकता वाढवली पाहिजे. दरपत्रक, हक्कपत्र, तक्रार निवारण प्रणाली ही धर्मपालनाची आधुनिक साधने आहेत.
निष्कर्ष : सेवाभावातूनच राष्ट्रनिर्मिती
डॉक्टर, वकील आणि पोलीस जर “कर्तव्य म्हणजे ईश्वरसेवा” या भावनेने कार्य करतील, तर समाजात न्याय, आरोग्य आणि सुरक्षिततेचा दिव्य संगम घडेल. “तैसे मुखी ब्रह्म नाम । हाती ते सात्विक काम ॥ परिविनियोग वीण । विफल होय ॥”
अर्थ : ईश्वराचे नाव जरी मुखी असले तरी कर्म सात्विक नसेल तर साधना निष्फळ ठरते. “धर्मो रक्षति रक्षितः” — जो धर्माचे रक्षण करतो, धर्म त्याचे रक्षण करतो. हीच ओळ आजही प्रत्येक डॉक्टर, वकिल आणि पोलिस यांच्यासाठी जीवनाचा ध्येयवाक्य असावी. सेवा, सत्य आणि सदाचार या तिन्ही मूल्यांवर समाज उभा राहिला, तर “सत्यमेव जयते” हे केवळ घोषवाक्य न राहता जिवंत वास्तव बनेल.
🕊️ निष्कर्ष : सेवेमधूनच मोक्ष : –
वकील, डॉक्टर आणि पोलीस हे जर “कर्तव्य म्हणजे ईश्वरसेवा” या भावनेने काम करतील, तर तोच खरा धर्मराज्याचा पाया ठरेल. “यः स्वधर्मे स्थितः शुद्धः स एव परमं पदम् प्राप्नोति।”
— जो आपल्या धर्मात निष्ठावान असतो, तोच परम पदाला पोहोचतो. हीच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. सेवा, सत्य आणि सदाचार या तिन्हींचा संगम म्हणजेच त्रिवेणी संगम – वकील, डॉक्टर आणि पोलीस
लेखक – डॉ. आनंद गोरख मोरे
M.D. (Ayurved Medicine), Yoga Teacher, LL.B. (Pursuing), Pune.





































