पोलीस प्रवाह न्युज
उस्मानाबाद, दि. ९- जय जिजाऊ वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन मार्फत भुम परांडा तालुक्यातील पूरग्रस्त गावातील कुटुंबाला मदतीचा हात देण्यात आला. स्वर्गीय मराठा प्रवीण पिसाळ सर यांच्या विचारावर व कार्याध्यक्ष अवधुत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन पुणे, मुंबई, सोलापूर, सातारा, सांगली टीम च्या वतीने दि. ५ ऑक्टोंबर 2 रोजी किरांणा किट आणि ५ टन पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. या कामी WMO चे मेडिकल टीम चे नवनाथ बोडके आणि टीम सचिन थोरात, दत्ता जगदाळे, युवराज सुरवसे, अभिजीत बाबर आणि टेंभुर्णी चे हॉटेल न्यू राजवीरचे मालक सोनाजी महाडीक पाटील भोसरी चे युवा नेते विश्वास लांडगे यांनी मोलाची साथ दिली तसेच डॉ. भगीरथ मोरे, डॉ. मनोज डोंगरे, पोलीस अधिकारी समाधान खरात आणि भोसरीचे उद्योगपती कल्याण बाबर यांनी पशुखाद्य उपलब्ध करून दिले.
कार्याध्यक्ष अवधुत सुर्यवंशी माध्यमांशी बोलताना म्हटले, या आलेल्या आस्मानी संकटाला शेतकऱ्यांनी धैर्याने सामोरे गेले पाहिजे WMO कायम तुमच्या बरोबर असेल असा आधार पूरग्रस्त लोकांना दिला, पूरग्रस्त गावांनी सुद्धा WMO करत असलेल्या कामाचे कौतुक केले.





































