पोलीस प्रवाह न्युज
“आयुष्य वेदा” म्हणजे आयुर्वेद, आणि “आयुष्य नीती” म्हणजे न्यायशास्त्र.” आयुर्वेद – जीवनाची समग्र चिकित्सा आयुर्वेद हा जीवनाच्या वेदांचा अभ्यास आहे. “हिताहितं सुखं दुःखं आयुष्यं तस्य हिताहितं । मानं च तच्च यत्रोक्तं आयुर्वेदः स उच्यते ॥” (चरक संहिता) म्हणजेच, कोणते जीवन हितकारक आहे आणि कोणते नाही, हे सांगणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद.
शरीर, मन, आत्मा आणि इंद्रिय यांच्या संतुलनावर आरोग्य अवलंबून असते. न्यायशास्त्र – सामाजिक जीवनाची नीती न्यायशास्त्र हे समाजजीवनातील न्याय-अन्यायाचे भान देणारे शास्त्र आहे. हक्क, कर्तव्य, कायदा, शिक्षा, नैतिकता यांचा अभ्यास करून समाज निरोगी ठेवण्याचे कार्य न्यायशास्त्र करते.
जशी आयुर्वेदात आरोग्य टिकवण्यासाठी दिनचर्या व औषधोपचार, तशीच समाजासाठी कायदे, दंड आणि अधिकारांची व्यवस्था न्यायशास्त्र सांगते. आयुर्वेद व्यक्तीच्या आरोग्यासाठी आहे, तर न्यायशास्त्र समाजाच्या आरोग्यासाठी. दोन्ही शास्त्रांचे अंतिम ध्येय – स्वस्थ, संतुलित, सुखी आणि सुसंस्कृत जीवन. जसे शरीरातील दोष समजल्याशिवाय उपचार शक्य नाही, तसेच समाजातील गुन्ह्यांचे कारण समजल्याशिवाय योग्य न्याय साध्य होत नाही. “जीवन म्हणजे एक प्रवाह आहे – शरीर, मन, आणि समाज यांचा. या प्रवाहाला दिशा देतो आयुर्वेद, आणि सीमा घालतो न्यायशास्त्र. एक आरोग्य जपतो, दुसरा सुसंस्कार. एक जीवनाला शुद्ध ठेवतो, दुसरा समाजाला समृद्ध.”
आयुर्वेद आणि न्यायशास्त्र यातील समांतरता – (Ayurveda and Law – A Parallel Perspective )
आयुर्वेदाचे ध्येय पाहता –
“स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं। आतुरस्य विकार प्रशमनम्।” म्हणजेच, जो स्वस्थ आहे त्याचे स्वास्थ्य टिकवणे म्हणजे “प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर” आणि जो आजारी आहे त्याचे विकार कमी करणे, त्याचे निरोगीपण पुन्हा मिळवणे.
न्यायशास्त्राचे ध्येय पाहता –
समाजात गुन्हे घडू नयेत यासाठी पूर्वतयारी, प्रबोधन, आणि न्याय साक्षरता निर्माण करणे. म्हणजेच, स्वस्थ समाज = गुन्हे रहित समाज आणि जेथे गुन्हा (क्राईम) घडतो, तेथे त्याची कारणे शोधून, त्यावर योग्य उपाय (रेमेडी) करून व्यक्ती आणि समाज दोघांनाही सुधारण्याची संधी देणे होय.

सामाजिक आरोग्याचे दोन टप्पे पाहता ते असे –
1. न्याय साक्षरता (Legal Awareness):
जशी आरोग्य साक्षरता आजार टाळण्यासाठी मदत करते, तशीच न्याय साक्षरता गुन्हे टाळण्यासाठी मदत करते. त्यामुळे लोकांनी कायद्यासंबंधी आपल्या हक्क आणि कर्तव्ये समजून घेतली पाहिजेत.
2. गुन्हा घडल्यावर उपाय (Remedial Justice):
गुन्हा करणाऱ्याची मानसिकता समजून घेणे, त्यामागील कारणांचा शोध घेणे, आणि योग्य शिक्षा किंवा पुनर्वसन (Rehabilitation) करून समाजात पुन्हा समावेश घडवणे.
उदाहरण – आयुर्वेद व विधिशास्त्र यांचा तुलनात्मक दृष्टिकोन: पाहिला तर
आयुर्वेद आणि विधिशास्त्र (Law) हे मानव शरीर स्वास्थ्या व समाज स्वास्थ्य रक्षणासाठी खालील उपाय सांगतात . रोग होऊ नये म्हणून दिनचर्या, ऋतुचर्या, युक्त आहार, विहार तर न्यायशास्त्रात गुन्हा होऊ नये म्हणून कायद्याचे ज्ञान, सामाजिक नियम, सदाचार इ . सांगितले आहेत .
आजार झाल्यास औषधोपचार,पंचकर्म, शमन व शोधन चिकित्सा इ. तर गुन्हा झाल्यास शिक्षा, सुधारणा, पुनर्वसन असे शास्त्रांत वर्णित आहेत .
आरोग्य साक्षरता तर कायदेविषयक साक्षरता .
दोष-दोषांमध्ये समतोल तर हक्क-कर्तव्यांमध्ये समतोल शास्त्रांत / संविधानात वर्णित आहेत. म्हणजेच जसा डॉक्टर आजार होऊ नये यासाठी आरोग्य शास्त्र शिकवतो. तसाच कायदा अभ्यासक किंवा न्याय यंत्रणा गुन्हे होऊ नयेत म्हणून समाज प्रबोधन करतो. “गुन्हेगारी ही समाजातील रोग आहे, आणि न्याय ही त्याची चिकित्सा.” असेच इतरही “आयुर्वेद आणि न्यायशास्त्र यातील समांतरता” पाहता
“Ayurveda and Law – A Parallel Perspective”
किंवा
“Similarities or conceptual alignment between Ayurveda and Jurisprudence.”
याचा अधिक स्पष्ट अर्थ पाहता – आयुर्वेद आणि न्यायशास्त्र ही दोन्ही शास्त्रे दिसायला वेगवेगळी असली, तरी त्यांचा ध्येय, तत्त्वे, कार्यपद्धती यामध्ये अनेक साम्य (समांतरता) आहेत. जसे आयुर्वेद आणि न्यायशास्त्र साम्य पाहिल्यास रोग निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य रक्षण तर गुन्हा होऊ नये म्हणून कायदा व जनजागृती . कारण शोधून आजारावर उपाय तर हेतू समजून गुन्ह्यावर शिक्षा/उपाय,
आयुर्वेदात निदान → कारण → उपचार तर न्यायशास्त्रात तपास → हेतू → शिक्षा / पुनर्वसन,
आयुर्वेदातील कार्यकारण भाव सिद्धांत तर न्यायशास्त्रात क्राइम आणि अबेटमेंटचे विश्लेषण मिळते , आयुर्वेराद सत्कार्यवाद तर न्यायात गुन्ह्याचे मनोविश्लेषण व सामाजिक मूळ याचाच अर्थ पाहता आपल्या लक्षात येईल की -“दोन्ही शास्त्रांचा उद्देश — व्यक्ती आणि समाज निरोगी, सुरक्षित, आणि संतुलित ठेवणे आहे.” आयुर्वेद आणि न्यायशास्त्र हे भारतीय संस्कृतीचे दोन अमूल्य आधारस्तंभ आसुन हे समाजधारणा, मानव कल्याण आणि विश्वशांती यासाठी जगाला भारतीय संस्कृतीचे वरदान आहेत .
आयुर्वेद: शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्याचे शास्त्र ( धर्मार्थ काम मोक्षाणां आरोग्यं मुलं उत्तमम् । ) तर न्यायशास्त्र: सामाजिक आरोग्य, न्याय व हक्कांचे रक्षण करण्यास सक्षम आह . दोन्हींचा गाभा पाहता कर्तव्य, कारण-परिणाम, संतुलन, व सर्वांगीण मानव, समाज कल्याणच आहे .
दोन्ही शास्त्रांचे विश्लेषण पाहता -“Criminal is a Person, Crime is a Disease, and Punishment is a Remedy” —
रोग Disease – अपराध Crime
निदान Diagnosis – न्याय Justice
उपचार Treatment – शिक्षा Punishment
आरोग्य Health – शांतता व सुरक्षा Peace & Security
या शास्त्रांचे अंतिम उद्दिष्ट पाहता सबल, शांततामय,सुरक्षीत व नैतिक समाजरचना असल्या कारणाने म्हणावेसे वाटते “न्यायाशिवाय शांती नाही आणि आरोग्याशिवाय जीवन नाही — आयुर्वेद व न्यायशास्त्र हेच खरे जीवनाचे रक्षक.”
लेखक: डॉ. आनंद गोरख मोरे
पात्रता: एम.डी. (आयुर्वेद), योग शिक्षक , एलएल.बी. ( चालू ), राजर्षी शाहू लॉ कॉलेज बार्शी . आयुष वैद्यकीय अधिकारी (कंत्राटी )
ग्रंथ लेखक – आरोग्यामृत व आरोग्याचे संविधान ग्रंथ .




































