पिंपरी : सामाजिक लघुपट, चित्रपटांद्वारे समाजात जनजागृती करणाऱ्या पुणे, पिंपरी चिंचवड मधील रेडबड मोशन पिक्चर ने प्रस्तुत केलेल्या सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनावर प्रकाश टाकणारा “अवकारीका” चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण आकुर्डी येथील एका कार्यक्रमात करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय परिषद सदस्य आयसीएआय सीए शिवाजी झावरे, संत साहित्याचे अभ्यासक प्रा संपत गर्जे, लोकमत पिंपरी चिंचवडचे वृत्त संपादक श्रीनिवास नागे, उद्योजक अमित भोसले, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष म्हात्रे, अवकारिका चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक सीए अरविंद भोसले, चित्रपटातील मुख्य कलाकार अभिनेते विराट मडके, डॉ नितीन लोंढे, अभिनेते रोहित पवार, राहुल फलटणकर, अभिनेत्री पिया कौसुंबकर, स्नेहा बालपांडे, पूजा वाघ, चित्रपटाच्या तांत्रिक टीम मधून डीओपी करण तांदळे, निर्मिती व्यवस्थापक चेतन परदेशी, सहाय्यक दिग्दर्शक रहमान, संगीत दिग्दर्शक श्रेयस देशपांडे, कलादिग्दर्शक शैलेश रणदिवे, ध्वनी मुद्रक योगेश क्षीरसागर, पोस्ट प्रोडक्शन चे नावेद अत्तार, सोशल मीडिया चे आनंद मुरुडकर आणि सुरज कुंभार, प्रफुल्ल कांबळे, विनोद खुरुंगळे, बालकलाकार वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा संपत गर्जे म्हणाले, “एका कवीला जसे कोणतीही गोष्ट वेगळ्या दृष्टिकोनातून दिसते आणि तो आपल्या साहित्याचा माध्यमांतून साकारतो, एका साहित्यिकांची कल्पना शक्ती ही विशेष असते , तसेच ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने हा विषय पडद्यावर जिवंत करून दाखवला आहे, ही खरोखरच मोठी गोष्ट आहे.”
सीए एस. बी. झावरे यांनी आपल्या भाषणात स्वच्छतेच्या शिस्तीवर भर दिला आणि सांगितले की, “स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे ही मोठी जबाबदारी आहे. रेड बड मोशन पिक्चर हे सामाजिक विषयावर चित्रपट निर्माण करत आहे, ही खूप अभिमानास्पद बाब आहे. मी अवकारीका टीमचे आणि विशेषतः समाजासाठी झटणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
स्वच्छता कर्मचारी रवींद्र भाट यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, “समाज स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे अजूनही उपेक्षित नजरेने पाहतो. ही मानसिकता बदलायला हवी. आम्ही स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी दररोज प्रयत्न करत असतो. ‘अवकारीका’ हा पहिला चित्रपट आहे, जो आमच्या वेदनांना मोठ्या पडद्यावर मांडत आहे.


































