पोलिस प्रवाह न्युज
गोरेगांव- दि. १४- इनोव्हा कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार नदीवरी संरक्षण भिंत तोडून समोरील झाडावर जोराने आदळल्याने झालेल्या अपघातात एक जागीच मृत्यू झाला, तर एक जखमी झाला . हा अपघात बुधवार दि. १४ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोणेरे पन्हळघर रस्त्यावर झाला. रुत्विक सुखदेव शिंदे वय २४ (रा . चिंचवली सोन्याची वाडी) असे या अपघातात मृत झालेल्या नांव आहे.
गोरेगांव पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रूत्विक शिंदे आणि दीपक दतात्रय तळवटकर (रा. गवळ आळी ) हे दोघे एम एच ०१ बीडी ८२०२ या क्रमांकाची इनोव्हा कार घेवून पन्हळ घर ते लोणेर अशी येत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार समोरच्या झाडावर जोरदार आदळली. त्यावेळी रुत्विक हा कारच्या बाहेर फेकला जावून तो झाड आणि कारच्या मध्ये चिरडला गेला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. कारमधील दीपक तळवटकर हा या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच गोरेगांव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक विजय सुर्वे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर क्रेनच्या साह्याने कार बाजूला करण्यात आली. गाडीची धडक इतकी जोरात होती की गाडीचे दर्शनी भागाचे मोठ हानी झालेली आहे.




































