पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १८- तालुक्यातील महिला विकास महिला मंडळ चिंचवलीवाडी आयोजित जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळ चिंचवलीवाडी हे रायगड जिल्ह्यातील एक नामवंत आणि शिस्तप्रिय मंडळ म्हणून ओळखले जाते. या मंडळाचा यावर्षी २६ वा वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असून शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात हे मंडळ नेहमी अग्रेसर राहिले आहे.
हनुमान मंदिराच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेला जेष्ठ समाजसेवक व रायगड भूषण अण्णासाहेब उचाटे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच माजी सरपंच कृष्णाशेट तटकरे, विद्यमान सरपंच नंदू पारावे, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष चंद्रकांत भोसले यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत गोविंद जांभळे यांची मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या उमेदवारीला ग्रामस्थांनी एकमुखी अनुमोदन दिले. यावेळी सागर कालेकर उपाध्यक्षपदी, सचिन मोरे खजिनदार, संजय पारावे सहखजिनदार, मंगेश कालेकर सचिव, आदित्य माने सहसचिव म्हणून निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून सचिन भोनकर, संकेत उचाटे, संदेश सुतार, सुशील दर्गे, सिद्धेश कालेकर, सुमित दर्गे, राजेश तांबडे, महेश तटकरे, सुरेश कालेकर, अक्षय कांबळे, अनिकेत तटकरे, निलेश पांचाळ आदींना संधी देण्यात आली.
यावेळी मंडळाच्या महिला समितीचीही निवड झाली. यात तनुजा शेलार, मृणाल कालेकर, राधिका तटकरे, श्रुती कालेकर, गार्गी जांभळे, नंदा पवार, उर्मिला कालेकर, नेहा पारावे, लावण्या पारावे, सानवी तटकरे, प्रियंका कांबळे, मनीषा होळकर यांचा समावेश झाला. मंडळाचे सल्लागार म्हणून जेष्ठ समाजसेवक अण्णा उचाटे, कृष्णा शं. तटकरे, नंदू पारावे, चंद्रकांत भोसले, विष्णू तटकरे, अशोक दायते, पांडुरंग भोजने, काशिनाथ बोर्ले, सिताराम मोरे, तुकाराम मंचेकर, अनंत कालेकर, सुरेश तांबडे, बबन तावडे, अंकुश मोरे, राकेश शेलार, चंद्रकांत होळकर, अनंत तावडे यांची नियुक्ती करण्यात आली.
सभेत सर्व मान्यवरांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले व आगामी चिंचवलीवाडी नवरात्र उत्सव मंडळाच्या नवीन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी गोविंद जांभळे तर उपाध्यक्षपदी सागर काळेकर यांची निवड नवरात्र उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. बहुसंख्य ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.या निवडीमुळे चिंचवली वाडी नवरात्र उत्सव मंडळाची परंपरा कायम राखत, आगामी वर्षात अधिक व्यापक सामाजिक व सांस्कृतिक कार्य होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.







































