पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १५- छावा प्रतिष्ठान माणगाव आयोजित लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग व दोस्त फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ सप्टेंबर रोजी माणगाव तालुक्यातील बामणोली येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिराल युवामोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, माजी पंचायत समिती सदस्या रचना थोरे, माणगाव तालुका अध्यक्ष भाजपा परेश सांगले, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बामणोली सुवर्ण सकपाळ,- किसान मोर्चा अध्यक्ष नयन पोटले,नितीन शेलार, अमोल पवार, पंकज लहाने, स्वप्नील साळवी, जितेंद्र गुगळे, राजीवली पोलीस पाटील शिवाजी अर्बन, सोनाली दसवते, साईनाथ पेणकर, अनंत गोपाळ पवार, सहदेव सकपाळ, राजेंद्र सकपाळ, महिपत पवार, आनंद पवार, सखाराम मुंढे, संतोष पवार, आशा पवार, भारती सुतार, रूपाली उभारे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन समीर पवार व अनिकेत करकरे यांनी उत्कृष्टरित्या केले. या शिबिरामध्ये विविध प्रकारचे आजार यांची तपासणी करण्यात आली. तसेच मोफत चष्मा व औषध वाटप करण्यात आले. यावेळी निलेश थोरे म्हणाले की, परिसरातील सर्व नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे व त्यांना अल्प दरात वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी छावा प्रतिष्ठानचे आभार मानले.