पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २०- पुणे दिघी महामार्गावर असलेल्या ताम्हिणी घाटात महिंद्रा थार कार ५०० दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वृत्त असे की, पुण्याहून दोन दिवसापूर्वी महिंद्रा थार घेऊन कोकणात फिरायला निघाले होते. परंतु त्यांचे फोन लागत नसल्याने व फिरायला निघालेल्या ठिकाणी ते पोहोचले नसल्याने नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली. दि. १९ नोव्हेंबर रोजी ताम्हिणी घाटात ड्रोनने शोध घेतला असता महिंद्रा थार ५०० फूट खाली दरीत कोसळली असल्याचे निदर्शनास आले. गाडीत चार इसम असल्याचे ड्रोनमध्ये निदर्शनास झाले आहे. चालकाचा नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. माणगाव पोलीस घटनास्थळी पोहचले असून रेस्क्यू टीमच्या सहकार्याने मदत कार्य सुरू आहे.





































