पोलीस प्रवाह न्युज
चिपळूण, दि. १६ –तीन किलोची गर्भाशयातील फायब्रॉईड गाठ काढण्यात वालावलकर रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांना यश आले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड येथील प्रणाली जाधव ( नाव बदलले आहे) यागेल्या वर्षभरापासून मासिकपाळीचा त्रास, पोटदुखी मुळे ग्रस्त होत्या. शिवाय शरीरातील रक्तही फार कमी होऊन वजन घटले होते. या तक्रारी साधारपणे चाळीशीच्या बऱ्याच स्रियांना असतात म्हणून सुरवातीला थोडे दुर्लक्ष्य केले पण नातेवाईकांच्या सल्ल्याने त्यांनी मुंबई येथे तपासणी करून घेतली. पण तिथे मात्र गर्भाशय किंवा अंडाशयाच्या कर्करोगाची शक्यता व्यक्त करत एम.आर. आय. चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्यांना टाटा मेमोरियल रुग्णालय, मुंबई येथे त्यांना पाठवण्यात आले होते. मात्र अपॉइंटमेंटसाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी चिपळूण डेरवण येथील वालावलकर रुग्णालय गाठले.
वालावलकर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लागेचच एम.आर.आय. तपासणी झाली आणि त्यात ही गाठ गर्भाशयातील फायब्रोइड (गाठ) असल्याचे निष्पन् झाले. हे निदान झाल्यानंतर प्रणालीला हायसे वाटले, पण हिमोग्लोबिन फक्त सहा ग्राम असल्याने तीन बाटल्या रक्त देऊन आधी तब्बेत सुधारण्यासाठी प्रयत्न झाले.
लगेचच शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला आणि संपूर्ण गर्भाशय, दोन्ही अंडाशय आणि नलिका काढण्यात आल्या. ही शस्त्रक्रिया स्त्री रोगतज्ञ डॉ.रक्षा शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. वैष्णवी गोरे आणि डॉ. निहारिका राऊळ यांच्या सहाय्याने पार पडली. शस्त्रक्रिया दीड तास चालली आणि त्यांच्या पोटातून आठ महिन्यांच्या गर्भासारखी दिसणारी तब्बल ३.७७५ किलोची ३० X ३० सेंटिमीटर मोठी गाठ काढण्यात डॉक्टरना यश आले. आता प्रणालीची तब्बेत सुधारते आहे पोट दुखी आणि मासिक पाळीचा त्रास पूर्ण पणे थांबला आहे.
फायब्रॉईड हा दार पाच स्त्रियांमागे एकीला होणार आजार आहे. ही गाठ गर्भाशयातील स्न्यायुंची असते आणि ह्यात कॅन्सर असण्याची शक्यता फार कमी असून प्रजननक्षम वयातील स्त्रियांमध्ये दिसून येते त्यामुळे घाबरून ना जाता त्वरित स्त्रीरोग तज्ज्ञांचं सल्ला घेणे आवश्यक आहे. अशी माहिती वालावलकर रुग्णालयाच्या संचालिका डॉ सौ. सुवर्णा पाटील यांनी दिली.




































