पोलीस प्रवाह न्युज
करमाळा – दि. २१- महाराष्ट्र राज्यातील चारही मुख्य जिल्ह्यांच्या सीमांवरती असणारे करमाळा शहर या शहराची ओळख आराध्य दैवत कमला भवानी मातेचे श्री राजेरावरंभा निंबाळकर यांनी १७२७ साली बांधलेले ऐतिहासिक भव्य दिव्य आसे प्रसिद्ध मंदिर आहे. पुरातन काळातील अतिशय देखणे आणि कोरीव चिरेबंदी दगडा मध्ये मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर उंच उंच अशा डिकमाळी, मंदिरा लगतच्या सात विहिरी, चोहोबाजूला तटबंदी, येणाऱ्या भावीक भक्तांचे लक्ष वेधून घेतात. भक्तांच्या नवसाला पावणारी देवी कमला भवानी मातेची करमाळा तालुक्यात सर्व दूर ख्याती आहे. परंतु परराज्यातून पर जिल्ह्यातून येणाऱ्या भाविक भक्तांना मंदिरा विषयी माहिती नसल्यामुळे भाविकांच्या संख्येमध्ये वाढ होत नाही. विशेष म्हणजे करमाळा शहराच्या याच मार्गावरून महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान अहिल्यानगर, पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर, धाराशिव अक्कलकोट, राशिन गाणगापूरला जावे लागते. हे सर्व प्रमुख महामार्ग करमाळा शहराजवळून जात आहेत. आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या प्रमुख दिंड्या ही याच मार्गाने येत असतात. “कमला भवानी मंदिराच्या भाविक भक्तांमध्ये वाढ होण्यासाठी करमाळा तालुक्याच्या मुख्य रस्त्याच्या सीमेवरती कमला भवानी मंदिराकडे जाण्यासाठी दिशादर्शक कमानी लावण्यात याव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते, गायक- प्रवीण अवचर यांच्याकडून केली जात आहे.

नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे विश्वासू आरोग्य दूत मंगेश जी चिवटे व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या निधीतून करमाळा शहरातील श्री देवीचा माळ रोड लगत भव्य असे तुळशी वृंदवन उभारण्यात आलेले आहे. यामुळे करमाळा शहराच्या सौंदर्यात वाढ झालेली आहे. करमाळा शहराच्या सुशोभीकरणासाठी चिवटे बंधू कडून निधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यानिमित्त मंगेश चिवटे यांचेकडे प्रवीण अवचर यांनी दिशादर्शक कमानी करण्याची मागणी केली तेव्हा मंगेश चिवटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.असे सांगण्यात आले. या चारही प्रमुख दिशांच्या सीमांवरती मंदिराकडे जाण्याच्या दिशादर्शक कमानी उभारल्यानंतर कमला भवानी मातेच्या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांचे संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी करमाळा कमला भवानी मंदिर समितीतर्फे सुख – सोयी उपलब्ध करून देऊ अशी माहिती मंदिर समितीचे सदस्य श्री अशोक घाटे यांनी दिले आहे.





































