पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ४– तालुक्यातील मौजे निजामपूर येथे शिव हॉटेल जवळ कारची ठोकर लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.४० वा. च्या सुमारास मारुती सुझुकी बेलेनो गाडी क्रमांक एम एच १२ एक्स टी ४४३७ वरील चालक क्रिशांत विजय उबाळे, वय १९ वर्ष, रा. पिंपळोली, जि. पुणे याने त्यांच्या ताब्यातील बलेनो गाडी पुणे बाजूकडून माणगाव बाजूकडे घेऊन जात असताना निजामपूर येथील शिव हॉटेल जवळ असलेल्या रिक्षा स्टँड जवळ आल्यावेळी सलीम मोहम्मद चाफेकर यांना ठोकर मारली. या अपघातात सलीम चाफेकर यांना दुखापत झाल्याने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे आणले असताना उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.स.इ.जाधव करीत आहेत.




































