पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २४- मागील काही वर्षांपूर्वी तालुक्यात उपविभागीग पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिलेले अतुल झेंडे यांनी माणगावमध्ये कायदा व सुव्यवस्था राखत आपले काम बजावले. त्याचीच प्रचिती म्हणून त्यांची रायगड जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती करण्यात आली. आणि त्या पदाला देखील योग्य न्याय देत अतुल झेंडे यांनी आपले कर्तव्य बजावले यामुळे त्यांना मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई उपनगर कल्याण डोंबिवली येथे पोलीस उपआयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली आता ते मुंबई उपनगरात कार्यरत आहेत. मात्र अतुल झेंडे यांची कार्यप्रणाली ज्या ठिकाणी जातील तेथील नागरिकांशी जुळवून घेऊन सामाजिक एकोप्याचे संबंध आणि ऋणानुबंध टिकविले याकरिताच माणगाव तालुक्यातील विळे विभागातील तरुण साजे ग्रामपंचायत चे माजी सरपंच व उद्योजक निलेश वांजळे, सचिन सावळे, शाम तवटे, जनार्दन सावळे, सिद्धेश पाबेकर आदी तरुणांनी पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीचे निमित्त होते ते म्हणजे अतुल झेंडे यांचा वाढदिवस, वरिष्ठ पोलीस प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रशासनात काम करीत असताना केवळ अधिकारातूनच नव्हे तर नागरिकांशी प्रेमाने वागत रायगड जिल्ह्यात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवून पदोन्नती मिळवून कर्तव्य चोख बजावणाऱ्या पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांना विळे विभागातील तरुणांनी भेट देत दीर्घायुष्यासाठी आणि यशसवी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




































