पोलीस प्रवाह न्युज
अमरावती, दि. ९- पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या आदेशानुसार दि. ७ सप्टेंबर रोजी प्रिती बाबा मिश्रा यांची पोलीस बॉईज असोसिएशन महिला आघाडी अमरावती शहर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी जाहीर केले.
प्रिती मिश्रा या अमरावती शहरातील सामाजिक कार्यकर्त्या असून त्या हिंदू महासंघटन च्या अमरावती जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल दिल्ली येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रिती मिश्रा यांचे सामाजिक कार्य आणि पोलीसांबद्दल असलेली त्यांची आत्मीयता पाहून संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रिती मिश्रा यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.