पोलीस प्रवाह न्युज
पुणे, दि. १२- स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त व मांगी गावचे सुपुत्र युवा नेते दिग्विजय दिगंबर बागल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मांगी येथील प्रगती विद्यालयामध्ये आनंद मेळा बाजार भरविण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पालकांमधून मोठा प्रतिसाद मिळाला. या आनंद मेळाव्याचे उद्घाटन. शीला प्रवीण अवचर, नूतन बागल यांच्या हस्ते करण्यात आले. या आनंदमेळाव्या मध्ये प्रगती विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
अशातच महिलांचा आवडता सण मकर संक्रांती साठी लागणारे वाणाचे साहित्यही या आनंदमेळा बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्यामुळे मांगी गावातील बऱ्याच महिलांनी या बाजारामध्ये गर्दी केली होती. यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान यावे म्हणून बाजार व खाऊचे स्टॉल लावण्यात आले होते .यावेळी प्रगती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अनुपमा देवकर मॅडमव सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी मांगी येथील ग्रामस्थ सुनील बागल, अशोक गवळी स्वप्निल पाटील, पप्पू शेठ देशमाने आदींसह. येथील ग्रामस्थांनी खरेदीसाठी या बाजारात गर्दी केली होती.


































