पोलीस प्रवाह न्युज
सोलापूर, दि. ८- यंदा प्रथमच सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून डीजे बंदीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची काटेखोर अंमलबजावणी होण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली व त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यात ठीक ठिकाणी गणपती उत्सवामध्ये बँड बँजो वादक कलाकार व पारंपारिक वाद्यांचे गजरातच श्री गणरायाला निरोप देण्यात आला.
या निर्णयामुळे मात्र बँड बँजो वादक कलाकारांना सुगीचे दिवस आलेले आहेत वर्षानुवर्ष गणपती उत्सव मिरवणुकांमध्ये मोठ मोठ्या महागड्या कर्कश्य वाजणाऱ्या डि. जे .ना जास्तीत जास्त मागणी असायची त्यामुळे पारंपारिक कलाकार बँड वादक, बँजो वादक कलाकारांना तुरळक ठिकाणीच काम असायचे त्यामुळे ऐन उत्सव काळात सणासुदीच्या काळात वादक कलाकारांची होणारी कमाई ही तुटपुंजी आसायची. त्यातच तरुणाई मध्ये डी. जे. चे वाढते आकर्षण पाहता हा पारंपारिक व्यवसाय बंद पडतोय की काय अशी अवस्था गेल्या काही वर्षांमध्ये दिसून येत होती.
मात्र यावर्षी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब व डी वाय एस पी अंजना कृष्णा यांचे मार्गदर्शनाखाली डीजे बंदी चे कडक धोरण राबवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील तालुक्यातील अनेक मंडळांनी लाखो रुपये खर्च करून ॲडव्हान्स मध्ये बुकिंग केलेले डीजे कॅन्सल करून, पारंपारिक वाद्य बँड बँजो यांना प्राधान्य देण्यात आले. यामुळे मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या आबालवृद्ध महिला मंडळ या सर्वांना गणेश उत्सवाच्या मिरवणुकीचा पुरेपूर आनंद घेता आला. कारण या अगोदर प्रत्येक वर्षी डीजेचा कर्कश्य खणखणाट लेझर लाईटचा तीव्र प्रकाश यामुळे आबाल- वृद्ध महिला यांना मिरवणुकांचा आनंद किंबहुना सहभाग घेताच येत नव्हता.
इतर तालुक्यांप्रमाणेच करमाळा तालुक्यामध्ये ही डीजे बंदीची पूर्ण कडक अंमलबजावणी करण्यात आली. यासाठी डीवायएसपी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्याच्या तहसीलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम व करमाळा तालुका पोलीस इन्स्पेक्टर रणजीत माने साहेब यांच्यातर्फे करण्यात आले. या निर्णयाला करमाळा तालुक्यातील गणपती उत्सव मंडळानेही मोठा प्रतिसाद दिला व यामुळेच यावर्षीची गणेश विसर्जनाची मिरवणुकी अभूतपूर्व अतिशय शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने झाली. या निर्णयामुळे मात्र कलाकारांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून बँड बँजो वादकांनी प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त केले..
डीजेंच्या अतिरेकामुळे बँड बँजो ची मागणी दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे बँड बँजो चालकांनीही डीजेच्या तोडीस तोड गाड्या म्हणजे फक्त नावाला बँड बँजो परंतु डीजे पेक्षाही महागडी सिस्टम आणि दमदार वाजणाऱ्या मोठमोठ्या गाड्या बनवल्या होत्या. यामुळे आम्हा वादक कलाकारांवरती मात्र उपासमारीचे दिवस आले होते. परंतु यावर्षी डीजे सोबतच या अतिशोक्ती करणाऱ्या बँड बँजो डीजे सिस्टीम मालकांनाही प्रशासनाने जरब बसवल्यामुळे त्यांना आम्हा वादक कलाकारांना चांगले मानधन देऊन काम द्यावे लागले. आम्हा कलाकारांची या माध्यमातून मागणी आहे की प्रशासनाने पुढेही असेच उत्सव काळात मिरवणुकांमध्ये लग्नसोळ्यांमध्ये डीजे सिस्टीम, बँड बँजो, डीजे सिस्टीमला बंदी घालावी . जेणेकरून आम्हा पारंपारिक वाद्य /वादक कलाकारांवरती उपासमारीची वेळ येणार नाही. – एक कलाकार
गेल्या काही वर्षापासून मी अनेक वेळा डीजे चाकणकर कसे आवाजातून होणाऱ्या दुष्परिणामच्या तक्रारी संबंधित विभागाकडे केलेल्या होत्या. परंतु, देर आये दुरुस्त आहे या म्हणीप्रमाणे यावर्षी सोलापूर जिल्हा प्रशासनाने जो निर्णय घेतला तो अतिशय स्वागताहार्य आहे. डीजे चा कर्ण कर्कश् आवाज व व लेझर लाईटच्या किरणांची प्रखरता यामुळे ज्येष्ठांना, आबाल वृद्धांना रुग्णांना होणाऱ्या भयानक त्रासातून मुक्तता झाली. – ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले