पोलीस प्रवाह न्यूज
पिंपरी दि. ७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सध्या विकासकामाच्या नावावर स्मार्ट पध्दतीने खर्च सुरु असून या खर्चामुळे सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीवर ताण येत असून भविश्यात कर्मचारी वर्गासाठी असणारे अनेक हक्काच्या आर्थिक लाभापासून कर्मचारी वर्गाला वंचित राहावे लागेल. यासाठी महापालिकेतील कर्मचारी वर्गाने अत्ताच सावध होऊन महापालिका वाचवण्यासाठी आपआपल्या पध्दतीने आपले योगदान देण्याचे अवहान शिव-फुले-शाहू- आंबेडकर कर्मचारी विचार मंचाचे अध्यक्ष संजय जगदाळे यांनी कर्मचारी वर्गाला केले आहे.
अशिया खंडात सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून ज्या नगरपालिकेचा उल्लेख केला जात होता ती नगरपालिका नंतर महानगरपालिकामध्ये रुपांतरीत झाली. पण सध्या स्मार्ट सिटी या गोंडसनावाखाली महापालिकेची लुट चालवली जात आहे, हे विवीध वर्तमान पत्राच्या माध्यमातून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून, व नागरी आंदोलनांच्या माध्यमातून सर्व कर्मचारी वर्ग पाहत आहे. यामुळे महापालिकेच्या कष्टकरी वर्ग ४ व ३ मधील कर्मचारी वर्गांच्या आर्थिक हिताच्या उपाययोजनेवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळेच धन्वंतरी सारख्या योजना बंद करुन नावात साधर्म्य असणाऱ्या खर्चिक योजना कर्मचारी वर्गाच्या माथी मारल्या जात आहेत. तसेच अनेक कर्मचारी वर्गाचे दहा, वीस व तीसचे अश्वासित योजनेचे लाभ देखील सेवा प्रवेश नियमाच्या नावाखाली कर्मचारी वर्गाला दिले जात नाहीत. महापालिकेकडून घर बांधणी व घर कर्जासाठी दिली जाणाऱ्या रकमेचे व्याज दर देखील कमी केले जात नाही. सताव्या वेतन आयोगानुसार वर्ग ४ व ३ मधील कर्मचारी वर्गाचे अनेक भत्ते वाढवले गेले नाहीत, वेतनातील तफावत दुर केल्या जात नाहीत.
लाड पागे समिताचा निर्णय होऊन देखील महापालिका प्रशासन त्या संदर्भात आदेश निर्गमित करत नाही. अनेक जागा रिक्त असून देखील कर्मचारीवर्गाला पदोन्नोती दिली जात नाही.
२००५ च्या नंतर आस्थापनेवर कायम झालेल्या कर्मचारी वर्गाला महापालिकेची आर्थिक परस्थिती उत्तम आहे यामुळे २०१९-२० ला जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तत्कालीन आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ठरव मंजूर करुन हारकत नसल्या बाबतचा ठराव महापालिके करुन देखील त्यांची अमंलबजावणी केली जात नाही.अनेक कर्मचारी वर्गाचे अतिकालीन भत्ते देखील महापालिका प्रशासनाने रोखून धरले आहेत. पण ठेकेदार तत्वावरील व मानधनावरील कर्मचारी वर्गाला मात्र ठेकेदाराचे हित जोपासण्यासाठी अतिकालीन भत्ता दिला जातो. अनेक कर्मचारी वर्गाने आपल्या कुटूंबाच्या वैद्यकीय उपचारासाठी केलेल्या खर्चाच्या बीलाची परिपुर्ती वैद्यकीय विभागाकडून वेळेवर व योग्य पध्दतीने केली जात नाही. अशा वरील सर्व कर्मचारी वर्गाच्या हक्काच्या मागण्यासाठी बजेट चे अथवा पैशाचे कारण दाखवून कर्मचारी वर्गाचे आर्थिक हित डावले जाते. पण स्मार्ट सिटी व सल्लागार कंपनी, सॅप,डिएम, संगणक प्रणाली, अशा गोंडस नावाखाली शहरातील नागरीकांच्या टॅक्स रुपी पैशाची उधळपट्टी मात्र राजेरोस पणे सुरु असते. अशा उधळपट्टीमुळे महापालिकेच्या कर्मचारी वर्गाचे भविष्यात पगार वेळेवर होतील की नाही या बाबत संघटनेला धास्ती लागून राहिली आहे. असे प्रकार जर वेळीच पालिका प्रशासनाने न थांबविल्यास संघटना व परिषदेच्या वतीने आंदोलन करण्याशिवाय कर्मचारी वर्गाला पर्याय उरणार नसल्याचे संजय जगदाळे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. तसेच येणाऱ्या काळात प्रत्येक कर्मचारी वर्गाला महापालिकेची आर्थिक स्थिती टिकली पाहिजे तिची लुट थांबली पाहिजे यासाठी देखील लढा द्यावा लागेल या बाबतही सावध राहण्याचे देखील अवहान केले आहे.



































