पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ३०- तालुक्यातील मौजे कशेणे गावात बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या कशेणे गावात मनोज गावाने यांना बिबट्याचं दर्शन दोन दिवसांपूर्वी झाले होते. परंतु, याची कोणाला खात्री होत नव्हती. दि. २९ जुलै रोजी रात्री १२. ४० सुमारास कशेणे गावातील गणपत सखाराम शिंदे यांच्या घराच्या पाठी मागील बाजूस लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या चा मुक्त संचार कैद झाला आहे. बिबट्याचा वावर गावात असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील तीन कुत्री सुद्धा याच बिबट्याने गायब केली असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. याबाबत वनविभाग अधिकारी प्रशांत शिंदे यांना माहिती देण्यात आली असून त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले आहे.
याबाबत वनविभाग अधिकारी यांनी कशेणे गावात बिबट्याचा संचार असल्याची स्पष्ट केले आहे. सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाला असून ग्रामस्थांची याबाबत बैठक करण्यात आली असून समाजप्रबोधन केले आहे. ग्रामस्थांनी रात्री अपरात्री फिरू नये. मुलांना एकटे बाहेर सोडू नये. धैर्याने, संयमाने उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.




































