पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १७-समस्त माणगांव तालुका वसीयांची साईसेवक पालखी चेरवली यावर्षी शेकडो साईभक्तांनी साई पालखी सह पदयात्रा सुमारे ४०० ते ५०० किमी पायी प्रवास करत श्री क्षेत्र शिर्डी येथे जाऊन साई बाबांचे दर्शन घेतले.हा प्रवास सुमारे ८ ते ९ दिवसांचा होता.पदयात्रा पूर्ण झाल्यानंतर स्वगृही परतताना साईभक्त शिर्डी मधून साई बाबांनी शेकडो वर्षांपूर्वी भंडारा साठी पेटविलेली धुनी घेऊन येतात आणि त्यानंतर साईभक्तांकडून चेरवली येथे साईभंडारा करण्यात येतो .या साई भंडाऱ्यात हजारो साई सेवक सहभागी झाले.हा साई भंडारा १७ जानेवारी रोजी चेरवली ग्रामदैवत बापूजी मंदिर येथे संपन्न झाला.या सोहळयात सकाळी साई सच्चरीत पारायण,दुपारी सत्यनारायण महापूजा व सायंकाळी भजन संध्या माणगाव, साईभक्ती गीते (कव्वाली) साईभंडारा संपन्न झाला.
या उत्सवात साईसेवक पालखी चेरवली पालखीसह पदयात्रा चे शेकडो साईसेवक उपस्थित होते.या दिंडीचे अध्यक्ष साईसेवक व खरवली सरपंच संतोष भाई खडतर यांच्या ठेवलेल्या शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि त्यांचा मानस व साईबाबा भक्तीची ओढ यामुळे साई भंडारा यावर्षी संपन्न होत आहे असे मत व्यक्त केले आहे.चेरवली येथे होणारा साई भंडारा हा उत्सव सामजिक एकता ,सामजिक सलोखा आणि सर्वधर्म समभावतेचा संदेश देणारा व शिर्डी स्व स्वरूप सद्गुरू साई बाबांचा संदेश जन माणसात पोहचविण्यासाठी साई सेवकांकडून केला जाणारा खारीचा वाटा म्हणून प्रयत्न आहे असे देखील संतोष खडतर यांनी सांगितले आहे.
चेरवली येथील १७ जानेवारी रोजी झालेल्या साईभंडारा कार्यक्रमात माणगाव,तळा,गोरेगाव,लोणेरे,इंदापूर ,निजामपूर ,कोलाड ,विभागातुम हजारो साईभक्त उपस्थित राहिले व भंडारा महाप्रसाद घेतला. या साई भंडारा कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनात अध्यक्ष संतोष खडतर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र साहिल खडतर, साईसेवक युवा मंच चेरवली, संदीप रघुनाथ खडतर,सुजित खडतर, सुनिल खडतर,राहुल खडतर, संजय खडतर ,सिद्धेश जाधव, अक्षय खडतर, यश खडतर, संकेत खडतर,शैलेश नामदेव खडतर, प्रशांत खडतर, प्रदीप खडतर,आदित्य खडतर, स्वप्निल खडतर,राजेश धाडवे, आकाश टेंबे, पंकज गजबे , नंदुराज वाढवळ व सर्व चेरवली ग्रामस्थ मंडळ चेरवली व महिला मंडळ चेरवली यांनी अथक परिश्रम घेऊन हा साई भंडारा कार्यक्रम यशस्वी केला.


































