पोलीस प्रवाह न्युज
माणगांव, दि. १९- तालुक्यात गेली २४ तास धुवांधार पाऊस पडत असून तालुक्याला पावसाने झोडून काढले आहे. तालुक्यात धुवांधार पाऊस पडत असल्याने सर्व नाले, नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. या धुवांधार पावसाने माणगांवमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित होऊन काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.

माणगांव तालुक्यातील गावांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. काळ नदी, गोद नदी तुडुंब भरून वाहत आहे. तालुक्यातील अनेक खेडेगावांजवळ पाणी तुंबले असून काही ठिकाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पूर्ण जलमय झाल्याचे चित्र या सतत पडत असलेल्या पावसामुळे दिसत असून इंदापूर, निजामपूर व सर्व ग्रामीण भागातील सर्वच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसाने माणगांव तालुकामधील असणाऱ्या शाळेतील विध्यार्थ्यांचे हाल झाले आहेत. तसेच निजामपूर वाकी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले आहे. तसेच रिळे पाचोळे गावाकडे जाणारे रोडला गोद नदीचे पाणी नद्यांच्या बाजूला असलेली शेती पूर्णतः पाण्याखाली आली आहे. मोर्बा रोड वरील पुल पाण्याखाली गेला आहे. यामुळे संपुर्ण जणजीवन विस्कळीत झाले आहे.




































