पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २- तालुक्यात श्री क्षेत्र शिर्डीचे पालक साईबाबा यांच्या साईभक्तीचा ओघ वाढताना दिसत आहे. दि. २ जानेवारी रोजी खरवलीचे सरपंच साईसेवक संतोष रघुनाथ खडतर यांच्या अध्यक्षतेखाली साईसेवक पालखी चेरवली हा पालखीसह पदयात्रा सोहळा श्री बापूजी मंदिर चेरवली ते श्री क्षेत्र शिर्डी असा ३०० किमी चा पायी प्रवास यामध्ये सुमारे २५० पदयात्री सहभागी झाले आहेत. हा पायी प्रवास ८ दिवसांचा असणार आहे.
या पालखीसह पदयात्रा सोहळ्यात अध्यक्ष संतोष खडतर यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्कप्रमुख सुजित खडतर, राहुल खडतर, सिद्धेश जाधव, सुनिल खडतर, आकाश टेंबे, संदीप खडतर, आदेश खडतर, संकेत खडतर, संजय सकपाळ, अनिकेत शिंदे, भारत आडित, राजेश धाडवे व बहुसंख्य साईभक्तांनी नियोजन आणि व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावली आहे. या पालखीसह पदयात्रेचा प्रवास दि. २ जानेवारी बापूजी मंदिर चेरवली ते खरवली लहाने सुरव मार्गे बामणोली रोड मार्गावरून निजामपूर रोड नाका ते दिघी पुणे मार्गावरून कोस्ते खुर्द ते कांदळगाव खुर्द वस्ती दि. ३ जानेवारी रोजी विंझाई माता मंदिर डोंगरवाडी व सोमजाई मंदिर चाचवली, ४ जानेवारी शेरे ते बापूजी मंदिर घोटवडे फाटा, ५ जानेवारी देहू गाव ते कमळजाई मंदिर महाळुंगे, ६ जानेवारी माले गाव ते एकलहरे गाव, ७ जानेवारी आळे फाटा ते मुक्ताबाई मंदिर बोटा तळपेवाडी, ८ जानेवारी विठ्ठल मंदिर जुना चंदनापुरी घाट ते समनापूर, ९ जानेवारी एअरपोर्ट रोड (मामाकडे) ते साई संस्थान आश्रम शिर्डी, १० जानेवारी साई संस्थान आश्रम ते साईबाबा मंदिर शिर्डी दर्शन असा प्रवासाचा क्रम आहे.
यावेळी बोलताना चेरवली साईसेवक पालखीचे अध्यक्ष व खरवली ग्रामपंचायत सरपंच संतोष खडतर म्हणाले की, ही साईदिंडी व पालखी सोहळा हा सर्व धर्म सहिष्णुतेचे प्रतीक आहे. जन्मासी यावे परी एकदा तरी शिर्डीस पायी जावे. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव ह्या उक्तीप्रमाणे साईबाबांचे कार्य, भक्तीभाव युवा पिढीमधे रुजवा आणि बाबांचे आशीर्वाद प्रत्येक साईभक्ताला लाभावे व प्रत्येकाच्या आयुष्याचे कल्याण व्हावे हा ह्या साईदिंडी चा उद्देश आहे





































