पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २२- माणगाव वाहतूक पोलीस नेहमीच आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात. आपल्या कर्तव्यासोबत सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. अशीच एक कौतुकास्पद कामगिरी माणगाव वाहतूक पोलिसांनी केल्याने चोरीला गेलेली दुचाकी मालकाला परत मिळाली आहे.
माणगाव एसटी स्टँड बाजूचे रिक्षा स्टॅन्ड येथे अज्ञात व्यक्ती दुचाकी गाडी सोडून गेली होती. त्यांची माहिती माणगाव एसटी स्टँड रिक्षा चालक यांनी माणगाव वाहतूक पोलिसांना कळवली. सदरील गाडी बजाज कंपनीची पल्सर गाडी क्रमांक एम एच १६ सी एच २३७२ आढळून आले असता ई चलन मशीनद्वारे तपशील काढून गाडी मालक अभिजीत वरडुळे रा. चापडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून सदर गाडी दि. २२ ऑगस्ट रोजी त्यांच्या ताब्यात देण्यात आली. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ट्राफिक पोलीस अंमलदार शिवराज बांडे व दीपक शेरकर यांनी सदरील गाडी मालकाच्या ताब्यात दिली.


































