पोलिस प्रवाह न्युज
म्हसळा – दि. ११– श्रीवर्धन मतदारसंघातील देवघर अंतर्गत रस्त्याच्या कामाचा उद्घाटन समारंभ आणि राष्ट्रवादी मधून देवघर ग्रामस्थ महिला भगिनी सह ग्रामस्थ मुंबई मंडळांसह कार्यकर्त्यांचा शिवसनेत जाहीर पक्ष प्रवेश दि. १० मे रोजी ना. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, युवा सेना जिल्हाप्रमुख विपूल उभारे, उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे, अनिल नवगणे, मा. प. स. सभापती सुजित शिंदे, रवि लाड, प्रसाद पाटील आदी शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी प्रवेश कर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, एवढ्या वर्षं राष्ट्रवादी पक्षा सोबत राहून विकासा पासून वंचित राहिलो. २५ वर्षा नंतर आमचा रस्ता आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळेच आम्ही देवघर ग्रामस्थ आपल्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहोत. या अगोदरच आम्ही निर्णय घेतला असता तर आमचा हा भाग सुजलाम सुफलाम झाला असता, असे यावेळी प्रवेशकर्ते म्हणाले.

































