पोलीस प्रवाह न्युज
लाटवण/मंडणगड, दि. २८ – मंडणगड तालुक्यातील लाटवण पंचक्रोशी विभागातील नाभिक समाज सदस्य आणि विभागातील युवा कार्यकर्ते संतोष दगडू जाधव उर्फ (पप्या) यांचे वडील लाटवण ग्रामपंचायतचे माजी कर्मचारी ह. भ. प. दगडू केशव जाधव यांचे दि. २६ सप्टेंबर रोजी वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचे दशक्रिया विधी रविवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी तर उत्तरकार्य बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी त्यांचे राहते घरी लाटवण ज्ञानेश्वरवाडी येथे होतील.
गावात आणि समाजात आणि वाडीत सर्व कार्यात समरस होऊन सर्वांशी मिळून मिसळून राहणारे आणि सर्वांशी प्रेमाची आणि आदराची वागणूक देणारे कै. दगडू केशव जाधव यांच्या जाण्याने जाधव कुटुंब आणि आप्तेष्ट परिवारावर शोककळा पसरली आहे. कै. दगडू केशव जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.



































