पोलीस प्रवाह न्युज
पुणे, दि. १३- गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सुनील सांबरे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ११ जानेवारी रोजी लाठी-काठी फिरवण्याचा १ तास ११ मिनिट ११ सेकंदाचा ‘ वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलेंस ‘ हा जागतिक विश्वविक्रम यशस्वीरित्या सादर करण्यात आला. मुळगाव आटपाडी सांगली येथील डॉ. टोके यांची कन्या कु. साईशा ही ज्ञान प्रबोधिनी केंद्र ( निगडी ) येथील विध्यार्थीनी आहे.
या विक्रमाची खास बाब म्हणजे ३ ते ११ वयोगटातील विद्यार्थ्यांचा सहभाग. यामध्ये युनिक इंटरनॅशनल स्कूल लोहगाव, न्यू मिलेनियम मिडीयम स्कूल सांगवी, समर्थ पोलीस लाईन सोमवार पेठ पुणे येथील एकूण १२९ विद्यार्थ्यांनी सलग १ तास ११ मिनिट ११ सेकंद लाठी काठी फिरवून विक्रम प्रस्थापित केला. हा विक्रम पुणे शहरात प्रथमच युनिक इंटरनॅशनल स्कूल लोहगाव येथे पार पडला. या विक्रमाचे अधिकृत परीक्षण माननीय विवेक पांडे यांनी केले. कार्यक्रमाला डॉक्टर विक्रम पाटील, डॉक्टर पूजा पाटील शेळके, पोलीस क्रेडिट सोसायटी चेअरमन माननीय सागर घोरपडे व राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू प्रमोद घाडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शाळेचे प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय कोबारणे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली सांबरे व कोमल मॅडम यांनी केले.





































