महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
मुंबई | राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.
हॅशटॅग:
#MaharashtraUpdates, #ताज्या_बातम्या, #अधोरेखित, #लाडकी बहीण, #NewsPortal
Recent Posts
पोलीस प्रवाह न्युज करमाळा, दि. ९- तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त करमाळा शहरामध्ये प्रथमच दि. ६ मार्च ते ८ मार्च दरम्यान महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्य... Read more





































