पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ४- तालुक्यातील आडघर येथील तुकाराम रोंगू दसवते यांचे चिरंजीव सचिन दसवते, भाई दसवते, नितीन दसवते यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दि. ४ जानेवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे ६०० सलाईन बॉटल, अत्यावश्यक ३४० इंजेक्शन देऊन वाढदिवस साजरा करत इतरांनाही प्रेरणा दिली आहे.
सदर औषधं माणगाव उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. अरुणा पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली रूग्णालयाच्या ताब्यात दिली. नवीन पिढीला आदर्श निर्माण करून या मुलांनी गरजू गरीब रुग्णांना जीवदान देणारी औषधे, इंजेक्शन वेगवेगळ्या स्वरूपात दिली. त्यांच्या निदर्शने आल्यानंतर आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिली. सचिन दसवते हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून देशसेवा करीत आहेत. तर भाई व नितीन दसवते हे आपला व्यवसाय सांभाळत समाजसेवेचे कार्य करीत आहेत.
ही औषधे व इंजेक्शन डिलिव्हरी, गंभीर रुग्ण, अपघात ग्रस्त, लकवा, ब्रेन हॅमरेज , हृदयविकार झटका आलेल्या रुग्णांना उपयोगी पडणार आहेत. हि अत्यावश्यक औषधे दिल्याबद्दल दसवते कुटुंब तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष खाडे यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करीत तुकाराम दसवते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.




































