पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २६- राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरदार फिरत आहेत. सर्व पक्ष ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. माणगाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या तळाशेत जिल्हा परिषद गटाच्या अंतर्गत येणाऱ्या साई पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. मौजे उमरोली/खरवली येथील राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना व अपक्ष उमेदवार यांच्या युतीला जाहीर पाठिंबा दिला आहे.
४६ तळाशेत जिल्हा परिषद गटात शिवसेना पक्षाकडून स्वाती अनिल नवगणे व ९२ साई पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार रचना निलेश थोरे या शिवसेना व अपक्ष युतीमार्फत निवडणुकीला सामोरे जात आहेत. या दोन्ही उमेदवारांना दिवसेंदिवस जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे. शिवसेना व अपक्ष युतीने कोट्यवधी रुपयांची विकासकामे या विभागात केली आहेत. त्यांच्या याच विकास कामांवर प्रभावित होऊन दि २६ जानेवारी रोजी उमरोली ग्रामस्थांनी या तिन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत युतीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
यावेळी शिवसेना नेते अनिल नवगणे, निलेश थोरे, साई पंचायत समिती उमेदवार रचना थोरे, परेश सांगले, सुशिल शिंदे, नयन पोटळे, अमोल पवार, महादेव कदम, विशाल मंचेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी योगेश खडतर, सिताराम सत्वे, रमेश मंचेकर, अनंत सत्वे, राजेश खडतर, निता खडतर विठाबाई खडतर, रिया खडतर, कमल मुंढे, पप्पू मुंढे, सौरभ वाढवळ, गुलाब मंचेकर, विलास सत्वे, मानसी सत्वे, विशाखा सत्वे, माधवी सत्वे, गणेश सत्वे, अभिषेक मालोरे, सरशी सत्वे, परेश सत्वे, सुजल सत्वे, काशिराम सत्वे, सुनिल सत्वे, मानसी महादेव सत्वे, बेबी सत्वे, सहादेव सत्वे, महादेव सत्वे, अनिल सत्वे, माधवी सत्वे, चंद्रि वाढवळ, विशाल सत्वे, निर्मला सत्वे, सुरेश सत्वे, रोहित सत्वे, नथुराम सत्वे, विठाबाई सत्वे, आसावरी मालोरे, संयोग सत्वे, रोहिणी सत्वे. प्रियंका सत्वे, नथुराम सत्वे, सुषमा सत्वे, पल्लवी सत्वे, रुपेश सत्वे आदी उमरोली ग्रामस्थांनी राष्ट्रवादीला राम राम करत शिवसेना व अपक्ष उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला.




































