![]()
त्वचाविकारामध्ये सोरियासिस हा आजार खूपच त्रासदायक व उपचारपद्धतीला सहसा प्रतिसाद न देणारा आजार आहे. पथ्य व्यवस्थित पाळून होमिओपॅथिक उपचाराने हा आजार खात्रीशीर बरा होतो व पुन्हा उद्भवत नाही.
आज कित्येक लोक या आजाराने त्रस्त आहेत. बाह्य उपचार पद्धतीने बरे होतात, मात्र आजार पुन्हा-पुन्हा वाढत पहिल्यापेक्षा आणखी वेगाने वाढतो. रुग्ण हतबल होतात.
होमिओपॅथिक उपचार पद्धत बहुउपयोगी आहे. सुरवातीला काहीही फरक नसला, तरीही काही दिवसांनंतर पूर्णपणे व कायमचा बरा होतो. त्रस्त रुग्णांनी काही दिवस सातत्याने उपचार घेण्याची गरज आहे. हा आजार बरा होत नाही हा गैरसमज आहे. काही रुग्ण औषधाला उशिरा प्रतिसाद देतात; पण नंतर बरे होतात. सोरियासिस संपूर्ण शरीरावर असतो. तसेच तळहात व तळपायामध्ये होणारे सोरियासिसही असते. जळवात प्रकारात संपूर्ण तळहात व पायाला भरपूर खोल चिरा पडून कित्येक वेळा त्यातून रक्त येऊ शकते. थंडीच्या महिन्यात याचा खूप तर त्रास होतो. जळवात हे कमी प्रमाणात बरीच वर्षे राहते. काहीवेळा साबण, सिमेंट व इतर रासायनिक वस्तूंच्या संपर्कात आल्यास वाढते. सोरियासिसपेक्षा बऱ्याचदा त्याचा कमी त्रास असतो.
सोरियासिसमध्ये डोक्यात कोंडा येऊन खपली धरते व केसात जाडसर चट्टा, कानाच्या मागे व कधी कधी संपूर्ण जाड थर संपूर्ण केसामध्ये बरीच वर्षे राहतो व कोंडा पडतच राहतो. संपूर्ण शरीर, कधी सांध्यांच्या वर छोटे चट्टे व कधी-कधी भरपूर चट्टे व संपूर्ण शरीरावर पातळ थर असू शकतो.
भारतात साधारणपणे २ से ३ टक्के हे आजार २० ते ४० या वयोगटात अधिक आहेत व मुलांमध्ये १ ते २ टक्के आहे. अन्य त्वचाविकारांप्रमाणे सोरियासिस हे संपूर्णपणे रुग्णांचे मानसिक त्रास, ताणतणाव यावर अवलंबून राहते. जागरण, अवेळी जेवण, व्यसन, चुकीचे खाणे, मानसिक अवस्था व राहणीमान यावर अवलंबून आहे शारीरिक व मानसिक अवस्थेत बदल झाले तर त्वचाविकार वाढतच राहतो. त्यासाठी औषधांबरोबर मानसिक अवस्था व राहणीमान बदलणे गरजेचे असते.
सोरियासिप्ससाठी होमिओपॅथिक उपचार पद्धत श्रेष्ठ आहे. हा आजार संपूर्ण मुळासकट बरा करायचा असेल तर मानसिक व शारीरिक तत्त्वावर प्रभाव करेल, असे औषध द्यावे लागते. होमिओपॅथिक ही जगात एकमेव उपचार पद्धती दोन्हीवर काम करते. आज भारतात ४ ते ७ टक्के त्वचाविकार रुग्ण आहेत. त्यात बुरशी, इसब, नखांचे आजार, कोंडा होणे, खाज, गांधी उठणे या प्रकारचे त्वचाविकार आहेत. इलाज करूनही बरेच रुग्ण पुन्हा-पुन्हा त्याच विकाराने त्रस्त आहेत, त्याला कायमचा नाहीसा करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा विचार होमिओपॅथिक उपचारात शक्य आहे. आज तब्बल २०० वर्षे उलटून गेली, तरी होमिओपॅथिक उपचारांनी अनेक आव्हानांना सामोरे जात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यापुढेही राहील. मानवजातीला हॉ. सॅम्युएल हानेमान यांनी दिलेली ही उदात्त देणगी आहे.

डॉ. उदयकुमार बारकी
D.H.M.S. Mumbai
पत्ता : वाळवेकर कॉम्प्लेक्स, इस्लामपूर
ता. वाळवा, जि. सांगली
मोबा. 9518378029
![]()



































