पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ३- गोरेगाव राजमाता मैदानावर झालेली सभा शिवसेनेसाठी नेहमीच लकी ठरते. आजची ही सभा शिवसेनेच्या उद्याच्या विजयाची नांदी आहे, असा विश्वास ना. भरतशेठ गोगावले यांनी गोरेगाव जिल्हा परिषद निवडणूकीचे उमेदवार दिनेश हरवंडकर व गोरेगाव पंचायत समिती गण उमेदवार स्वाती कारकरे, लोणेरे पंचायत समिती गण उमेदवार रवींद्र टेंबे यांच्या प्रचारार्थ सभेत व्यक्त केला. गोरेगांव येथील शिवसेना उमेदवारांच्या झालेल्या प्रचार सभेत ना भरत गोगावले बोलत होते.
या सभेस शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार दिनेश हरवंडकर, रवी टेंबे आणि सर्व पंचायत समिती उमेदवारांह युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, महिला जिल्हा संघटक निलिमा घोसाळकर, निलेश केसरकर, प्रताप घोसाळकर, गोरेगांव ग्रामपंचायत सदस्य, माजी जि. प सदस्य अमृता हरवंडकर, रमेश मोरे, शिवसेना नेते प्रकाश हरवंडकर उपस्थित होते .
विधानसभा निवडणुकीत रायगडमधील सर्वाचिक मताधिक्य मला लोणेरे व गोरेगांव जि. प मतदार संघात मितळाल्याचे ना . गोगावले यांनी यावेळी स्पष्ट करताना हाच टेम्पो कायम ठेवावा असे आवाहन केले. ते म्हणाले की, यापुढे रायगडमधे शिवसेना राष्ट्रवादीशी युती करणार नाही आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचा एक हाती भगवा फडकवेल असा विश्वास व्यक्त केला. आजची सभा ही विरोधकांना एक मेसेज असल्याचे सुतोवाच केले . या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडून आणून शिवसेनेचा भगवा फडकवेल असा ठाम विश्वास ना. गोगावले यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी सोबत केलेली युती ही पाप होतं – विकास गोगावले गोरेगांव
मागील खासदारकीच्या वेळी राष्ट्रवादी आपण युती करून घड्याळ वर मतदान करून जे पाप केले, ते पाप आपण केल त्या बद्दल मी दिलागिरी व्यक्त करतो पुन्हा आयुष्यात हे पाप करणार नाही असा विश्वास व्यक्त केला. दक्षिण रायगड मधील सर्व उमेदवार निवडून आणू, धनुष्य बाण वर सगळ्यांनी मतदान करा, जेव्हा या सर्व जागा आणल्या तर आ. भरत गोगावले पालकमंत्री होतील अशी ग्वाही विकास गोगावले यांनी दिली. यावेळी त्यांनी ना . भरतशेठ यांनी या जिल्ह्यात तसेच जि.प मतदार संघात केलेली विकासकामे अधोरेखित केली . प्रमोद घोसाळकर अरुण चाळके, निलिमा घोसाळकर ‘ स्वाती करकरे राम टेंबे यांनीही यावेळी सेनेच्या उमेदवारांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले.
निवडणुकीत ना गोगावले यांच्या पुढाकाराने महाड पंचायात समितीचा उमेदवार विनविरोध निवडून येवू शकतो हे मतदारांनी दाखवून दिले असल्याचे सांगून विकास गोगावले यांनी मतदारांना धन्यवाद दिले. मंत्री भरतशेठ गोगवले यांनी गोरेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आणि निजामपूर भागात मोठ्या प्रमाणावर निधी देऊन विकासकामे केल्याचे भाषणात नमूद केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन विकास गोगावले यांनी केले.
भरतशेठच्या पावलावर पाऊल ठेवून” विकास गोगावले भविष्यात अधिक चांगले काम करतील, असा विश्वास या वेळी विकास गोगावले यांनी व्यक्त केला. तसेच कार्यकर्त्यांनी वा अन्य कुणी चुकीचे काम केले तर याद राखा अशी सक्त ताकीदही विकास गोगावले यांनी यावेळी दिली. या वेळी अरुण चाळके, प्रमोद घोसाळकर, निलिमा घोसाळकर, राम टेंबे, दिनेश हरवंडकर, रवी टेंबे, स्वाती करकरे यांनीही शिवसेना उमेदवाराना निवडून देण्याचे आवाहन केले.
तसेच या वेळी पक्षाचे आदेश मानून आपली उमेदवारी जाहीर न केल्याने विकास गोगावले यांनी विकास, गायकवाड,अनिकेत घोसाळकर, प्रकाश टेंबे यांना धन्यवाद देत त्याचे शाल श्रीफळ देऊन धन्यवाद मानले.




































