पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २१- नगरपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषद पीएमश्री उतेखोलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना दामिनी पथकाने शुक्रवार दि. २० जून रोजी भेट देऊन महिला वर्गाचे रक्षण कसे करावे या विषयावर मार्गदर्शन केले.
माणगाव पोलीस ठाण्यातील दामिनी पथकातील महिला पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वरी सावरकर आणि पूजा भरकडे यांनी भेट देऊन दामिनी पथक महिला वर्गाचे कसे रक्षण करते, मुलींनी स्वतः ची सुरक्षा कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. मुलींच्या मनातील भीत नष्ट करण्यासाठी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी दामिनी पथक हे रायगड जिल्ह्यात उत्तम कार्य करीत आहे. माणगाव मधील दामिनी पथकाचे महिला पोलीस कॉन्स्टेबल माहेश्वरी सावरकर आणि पूजा भरकडे यांचे शाळा व्यवस्थापन तसेच विदयार्थी प्रतिनिधी आणि शिक्षक, शिक्षिका विनया जाधव, शमिका आंबुर्ले, मुख्याध्यापक स्नेहल उतेकर, शिक्षिका, पालक, विद्यार्थी यांनी स्वागत केले.




































