पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १६- यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रासह बहुतेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन या तालुक्यातील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख स्वाती सखाराम दबडे यांच्यावतीने माणगाव तहसील कार्यालय येथे माणगाव तहसीलदार यांना देण्यात आले.
अवकाळी पावसामुळे शेतामधील भाताच्या पिकासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुबार शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. अचानक अवकाळी पाऊस आल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनावरांसाठी चारा असलेले कडवळ व इतर चारा पीके पाण्याखाली वाहून गेली आहेत. तसेच दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन या तालुक्यातील नागरिकांचा शेती हाच प्रमुख व्यावसाय असल्यामुळे अवकाळी पाउसामुळे पेरणी केली नसल्याने मोठ्या प्रमाणात येथील शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. वरील तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे तेथील शेतकरी खूप चिंताग्रस्त असून ठिकठिकाणी वादळ पाऊस व या पावसामुळे झालेल्या संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख स्वाती सखाराम दबडे यांनी केली आहे निवेदनाद्वारे केली आहे.


































