पोलीस प्रवाह न्युज
तळा, दि. २१- जागतीक योग दिनाचे औचित्य साधून पन्हेळी (गायमुख ) येथील कृष्णा खांडेकर कुटुंबीयांच्या वतीने अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कुमार रेअंश क्षीरसागर याच्या वाढदिवसानिमित्त कृष्णा दगडू खांडेकर यांच्या कुंटुबीयांकडून अंगणवाडी व गायमुख शाळेतील ई. १ ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, रेनकोट, पाणी बॉटल, पेन, पेन्सिल, पट्टी, कलर तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इ.५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना रजिस्टर(लॉन्ग) बुक, छत्री, पाणी बॉटल, पेन, पेन्सिल, पट्टी इ. शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
अमिष भौड यांनी प्रास्ताविकेत पन्हेळी/ गायमुख या डोंगरात बसलेल्या गावांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेसाठी प्रयत्न करणारे शिक्षक वर्ग यामध्ये स्पर्धा परीक्षा त्याचप्रमाणे सर्वांगीण विकासा संदर्भात क्रीडा, सांस्कृतिक विविध प्रकारच्या कला यासाठी विद्यार्थ्यांमध्ये येथील शिक्षक प्रेरणा निर्माण करतात. खांडेकर यांच्या कुटुंबीयांकडून सामाजिक कार्याची जाण ठेवून खारीचा वाटा उचलून शैक्षणीक साहित्य वाटप करून मोलाचं योगदान दिले आहे. समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेतून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. प्राथमीक शाळा पन्हेळी वतीने आभार व्यक्त करतो. आपल्या गावातील अंगणवाडी ते इयत्ता १० वी पर्यंत एकूण ८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्या संदर्भात खांडेकर कुटुंबाचे कौतुक केले. कृष्णा खांडेकर यांनी आपले मनोगतातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. गोर गरीब विद्यार्थी शिक्षणापासून व शैक्षणीक साहित्य पासून वंचीत राहू नये म्हणून रिअंशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणीक साहित्य वाटप केले आहे. तसेच इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा फी भरण्याची सांगितले. प्रद्युम्न खांडेकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये आत्मविश्वास बाळगला तर आपण अशक्य गोष्ट शक्य करू शकतो असे सांगितले. श्रीमती व्यवहारे मॅडम यांनी देणगीदारांचे दात्यांचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कृष्णा खांडेकर, प्रद्युम्न खांडेकर, किरण खांडेकर, विनायक कांबळे, राजश्री कांबळे, लक्ष्मण खांडेकर तसेच प्र म जोशी प्रशाला पन्हेळीच्या मुख्याध्यापिका व्यवहारे मॅडम व सर्व शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग तसेच प्राथमिक शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक कृष्णा कांबळे, अमिष भौड, जगताप सर, उगलमुगले सर, अंगणवाडी ताई शिगवण मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

































