पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २७- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दिवसेंदिवस चुरस वाढत चालली आहे. निजामपूर जिल्हा परिषद गटासाठी पाटणूस पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पाणसई गावातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी नेते चंद्रशेखर(बाबुशेठ)खानविलकर, कोकण प्रवक्ते तथा निजामपूर जिल्हा परिषद उमेदवार ॲड. राजीव साबळे, पाटणूस पंचायत समिती गण उमेदवार संजोग एकनाथ मानकर, माणगाव नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, कार्याध्यक्ष शिवाजी घाग, युवक अध्यक्ष शैलेश खांडसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, पाटणूस गणातील कार्यकर्ते उपस्थित होते. पाटणूस पंचायत समिती गणात संजोग मानकर तरुण, तडफदार नेहमी समाज कार्यात अग्रेसर असणारा उमेदवार मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लहानापासून थोरांपर्यंत सर्वांच्यात मिळून मिसळून राहणारा नेता संजोग मानकर यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
पाटणूस पंचायत समिती गणातील कालवण, पाणसई, मुठवली, भिनाड, सिद्धार्थनगरमध्ये प्रचार रॅली काढत सर्वांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवून विकासकामे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा खा. सुनील तटकरे , महिला व बाल विकास मंत्री ना. आदिती तटकरे, मा. आ. अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर जिल्हा परिषद गटात मूलभूत सुविधा, दळणवळण, आरोग्य, पाणी व्यवस्थापन, शिक्षण, गृहनिर्माण, रोजगार, पर्यटन, सांस्कृतिक विकास व महत्वाच्या प्रकल्पांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भर देणार असून विकासाचा मुद्द्यावरच निवडणूक लढवणार आहे. निजामपूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


































