पोलीस प्रवाह न्युज
जळगाव, दि. २४- भूषण पंढरीनाथ नगरे यांची ” पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव ” जिल्हाध्यक्ष पदी नवीन नियुक्ती करण्यात आली असल्याचे पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी सांगितले आहे.
भूषण नगरे हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील रहिवासी असून ते पोलीस परिवारातील सदस्य आहेत. सन २०२० पासून ते पोलीस बॉईज असोसिएशन मधे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष या पदावर काम करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय या सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी ते पोलीस बॉईज असोसिएशनच्या माध्यमातून सतत कार्य करत असल्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी भूषण नगरे यांच्यावर ” जळगाव जिल्हाध्यक्ष ” पदाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.




































