पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १- गेली १३ वर्षाची परंपरा आणि १४ व्या वर्षात पदार्पण, अखंड साईभक्ती असलेली माणगांव ओम सिद्धी साई दिंडी कोकण ही दि. १ जानेवारी रोजी माणगाव शहरातील नाणोरे ते श्री क्षेत्र शिर्डीकडे जाणाऱ्या पदयात्रेचा प्रारंभ सकाळी ११ वाजता झाला. या पदयात्रेतील श्री साई पालखी व पदयात्रा सकाळी नाणोरे येथील साई मंदिर येथून सुरुवात झाली. त्यानंतर नाणोरे चे ग्रामदैवत जनी बापूजी मंदिराला प्रदक्षिणा देत व नाणोरे गावाला प्रदक्षिणा देत ही पालखी पदयात्रा मुंबई गोवा महामार्गवरून श्री दत्त मंदिर माणगाव -श्री साई मंदिर विकास कॉलनी ते दशरथ गावडे यांचे निवासस्थान व त्यांनतर हॉटेल साईराम त्यानंतर निजामपूर येथे रात्री वस्ती अशी पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डी कडे रवाना होणार आहे.
सुमारे ३०० किमी पायी प्रवास असणाऱ्या पदयात्रेत सुमारे ४०० साईभक्त सामील आहेत. तर त्यापैकी १८० साईभक्त पायी प्रवास करणार आहेत. या परंपरागत दिंडीचे नियोजन संस्थापक अशोक वाढवळ यांच्या प्रेरणेने साई चरणरज समाधान उतेकर, कान्हा महाराज, कार्यकारिणी अध्यक्ष सुभाष उतेकर, उपाध्यक्ष गजानन वाढवळ, सुरज जगदाळे, चिटणीस महेंद्र पाटोळे, सहचिटणीस नयनेश साखरे, योगेश लाड, सिद्धेश राजेशिर्के, पालखी सोहळा अध्यक्ष महेश शिर्के, मराठी उद्योजक व साईसेवक सुभाष(दाजी)दळवी, उपाध्यक्ष मनोज पोवार, खजिनदार परेश म्हात्रे, सल्लागार दीपक थळकर, कार्याध्यक्ष मिलिंद साखरे, उपकार्याध्यक्ष भारत जाधव, प्रविण गुरव, सागर कोळवनकर, जेष्ठ सल्लागार विनायक पवार, विवेक जाधव, श्रीकांत लोळगे, दिपक थळकर, विजय साखरे, अमोल जाधव, राकेश गायकवाड, जयदास वाढवळ, नंदुराज वाढवळ, किशोर वाढवळ, रमेश बक्कम, गणेश जोरकर, राकेश जाधव, निलेश शोष्ते, संजय सांगले तसेच साईसेवक कोल्हाण इंदापूर शाखा अध्यक्ष महेश शिंदे व अक्षय कडवेकर, नाणोरे शाखा आकाश मालुसरे व संतोष महाडिक, साले शाखा संदीप जाधव, माणगाव उतेखोल शाखा निलेश पालकर आणि सुदेश पालकर, निजामपूर शाखा सुरेश जोशी व कमलेश शिर्के यांच्या सह माणगाव तालुक्यातील बहुसंख्य साईभक्तांनी या पालखी सोहळ्याचे सुसज्ज नियोजन व व्यवस्थापन केले आहे.
या पदयात्रेचा प्रवास सुमारे ८ दिवसांचा असून प्रतिदिन ४० किमी अंतर साईभक्त कापणार आहेत. ही साईपालखी निजामपूर नंतर दि. २ जानेवारी रोजी डोंगरवाडी विंझाई देवी मंदिर ताम्हिणी, ३ जानेवारी मुळशी पौड, ४ जानेवारी पौड ते देहू, ५ जानेवारी राजगुरू नगर अवसर फाटा मंचर, ६ जानेवारी आळेफाटा धारगाव, ७ जानेवारी साकुरफाटा ते संगमनेर, ८ जानेवारी कवठे कमळेश्वर ते नांदूरखी, ९ नांदूरखी ते श्री क्षेत्र साईमंदीर शिर्डी असा असणार आहे.या पालखीच्या मिरवणुकीचे खास आकर्षण असते ते पद यात्रेत सामील झालेला नाचणारा घोडा.!
ही श्री साई पालखी पदयात्रा सामाजिक एकोपा टिकावा, समाज सलोखा निर्माण व्हावा, सर्वधर्म सहिष्णुतेची शिक्षण समाजात रुजावी, साईबाबांची महती व चमत्कार जनमानसात रुजावे हा उद्देश साईदिंडीच्या माध्यमातून आम्ही समाजात रुजवण्याचा आम्ही श्री साई प्रेरणेने प्रयत्न करत असल्याचे मत साईचरणरज समाधान उतेकर व पालखी सोहळा अध्यक्ष महेश शिर्के यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
दरवर्षी पेक्षा या वर्षी ओम सिद्धी साईदिंडी कोकण माणगाव ला हजारो माणगांवकर आणि शेकडो साईभक्त उपस्थित होते माणगाव तालुक्यातील बाजारपेठ, विकासकॉलनी, साईनगर, दत्तनगर, गणेशनगर या विभागातील आबालवृद्धानी पालखीचे दर्शनघेत पुष्पसुमनानी स्वागत केले. तसेच आदर्श समता नगर माणगांव विकास कॉलनी तसेच माणगांव शहरातील साईनगर येथे सुरेश खाडे यांच्या निवासस्थानासमोर साईनगर मधील असंख्य भाविकांनी पदयात्रेतील पालखीचे दर्शन घेत मनोभावे पूजा केली.





































