पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ७- तालुक्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. दिघी पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस व दुचाकी मध्ये अपघात होऊन आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ७ जानेवारी रोजी तक्रारदार यांचा मुलगा आरुष समिर गुगले, वय ८ वर्षं व त्यांचे सासरे शांताराम गुगले, रा. निलगुण, पो. बामणोली, असे होंडा प्लेझर स्कुटी क्र एम.एच.०६ सी. जे.२०६३ ने माणगाव शहरातील मोर्बा रोडवरील साई सायकल मार्ट माणगाव येथे मयत मुलगा याचा सायकलचा टायर दुरुस्त करण्याकरिता दिला असल्याने तो आणण्याकरीता आल्यावेळी दुपारी १.३० वा च्या सुमारास माणगाव बाजुकडुन मोर्बा बाजू कडे येणारी बस क्र. एम. एच. १२ वाय. बी.७१४८ वरील चालक आरोपी सूरज मछिंद्र पवार, वय २७ याने अतीवेगाने येउन रोडच्या साईडला उभे असलेल्या होंडा प्लेझर स्कुटीला ठोकर मारुन अपघात केला. या अपघातात आरुष समिर गुगले याला लहान मोठया स्वरुपाच्या दुखापती होउन त्याचा मृत्यू झाला. तसेच तक्रारदार यांना देखील दुखापत झाली असून दोन्ही वाहनाच्या नुकसान झाले आहे.
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. बेलदार करीत आहेत.





































