पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. ९- तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त करमाळा शहरामध्ये प्रथमच दि. ६ मार्च ते ८ मार्च दरम्यान
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेश दादा चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका शिवसेना मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती तर्फे शिव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र पार्श्वगायक गीतकार संगीतकार, सामाजिक कार्यकर्ते यांचा कलाक्षेत्रातील योगदान व करमाळा तालुक्याचे नाव जगभरात गाजवल्याबद्दल प्रवीण अवचर व त्यांच्या सुविद्य पत्नी महिला प्रबोधनकार ज्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आणि सामाजिक कार्यातून व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव अशा जनजागृती अभियानातून, हुंडाबळी त्याचप्रमाणे विभक्त कुटुंब व्यवस्था विरोध करून शेकडो कुटुंब विभक्त होण्यापासून वाचवणाऱ्या शिला अवचर यांचा करमाळा शहराच्या नूतन नगराध्यक्षा मोहिनी सावंत व शिवसेना जिल्हाध्यक्ष महेशदादा चिवटे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विशेष
सन्मान करण्यात आला.
या महोत्सवामध्ये मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रमाणे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. शुक्रवार दिनांक ६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महाआभिषेक करण्यात आला. यानंतर मर्दानी खेळ स्पर्धा घेण्यात आली. त्याचबरोबर शिवप्रसाद वाटप करण्यात आला. याच दिवशी रक्तदान शिबिर यानंतर सायंकाळी ह भ प गोरख महाराज तुपे (आळंदी )यांच्या भारुडाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता . दुसऱ्या दिवशी शनिवारी ७ मार्चला वटवृक्ष श्री स्वामी समर्थ वृंदावन भूमि पूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
याच दिवशी सायंकाळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील प्राविण्य मिळवलेल्या कर्तबगार महिला व पुरुषांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. सायंकाळी शाहीर महाविजेता अविष्कार देशिंगे, यांचा शाहिरी पोवाडयाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तिसऱ्या दिवशी रविवार दिनांक ८ मार्च रोजी सकाळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य दूत मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर व मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.
या शिबिरामध्ये नेत्र रुग्णांना (२७५ )चष्मा चे मोफत वाटप करण्यात आले. व गरजू रुग्णांना ३ लाख रुपयांची औषधे वाटप करण्यात आली.
याच दिवशी सायंकाळी महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. खास महिलांसाठी सिने अभिनेत्री अर्पणा दळवी यांचा न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यामध्ये महिलांसाठी रोख रकमेसह टीव्ही, फ्रिज, मिक्सर, कुलरसह मोठमोठे बक्षिसे विजेत्या महिलांना देण्यात आली. हे सर्व कार्यक्रम करमाळा येथील देवीचा माळ रोड येथील तुळशी वृंदावन परिसरात घेण्यात आला होता. या तीन दिवसीय ,”शिवमहोत्सव ” उत्सवाला करमाळा तालुक्यातील महिला व पुरुष मंडळी सह शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. करमाळा शहरात प्रथमच असा भव्य दिव्य आणि आगळावेगळा सांस्कृतिक सामाजिक स्वरूपाचा “शिवमहोत्सव “आयोजित केल्याबद्दल तालुक्यातील सर्व स्तरातून महेशदादा चिवटे यांचे विशेष कौतुक केले जात आहे .हा पूर्ण महोत्सव पार् पाडण्यासाठी शहरातील शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी व महेश दादा चिवटे, दिनेश घोलप, श्री गोरे गुरुजी, श्री राजे भोसले नागेश चेंडगे यांच्या सह् सर्वच सन्माननीय सदस्यांनी आहोरात्र मेहनत घेतली.



































