पोलीस प्रवाह न्यूज
पिंपरी – दि. २० – महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे मा. अध्यक्ष शेरसिंग डागोर साहेब(राज्यमंत्री) यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त यांच्यासह सर्व विभागाच्या अधिकारी वर्गाची एक संयुक्त बैठक घेतली. यामध्ये कामगारांच्या वतीने जेष्ठ कामगार नेते गणेशजी भोसले व संजयबापू जगदाळे यांनी सफाई कामगारांच्या विषयी अनेक समस्या व प्रश्न उपस्थित केले. या बाबत सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी महापालिका आयुक्त यांना कर्मचारी वर्गाच्या समस्या बाबत दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले. यावर आयुक्त शेखरसिंह यांनी कामगारांच्या समस्या बाबत एक समिती नेमून त्यावर तात्काळ उपाय योजना केल्या जातील असे अश्वासन दिले. अँड.सागर चरण, तुकाराम गायकवाड, सुशिल डोळस, यासह अनेक कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
भोसले व जगदाळे यांनी उपस्थित केलेले मुद्दे:-
१.)लाड-पागे वारस नियुक्ती बाबत प्रशासन चाल ढकल करत असून वारसांच्या शैक्षणिक आहर्तेचा विचार न करता वारसांना त्यांच्या मनमानी पध्दीतीने नियुक्त्या देत आहे. तर वर्ग ३ मधील अनेक पदे सध्या रिक्त आहेत त्या पदांवर त्यांची शैक्षणिक अहर्तापाहून नियुक्ती करावी.
२.) निगडी येथील सफाई कामगारांना श्रमसाफल्या योजनेतून दिलेल्या घरा बाबतीत अदयपही प्रशासनाने कायदेशीर मालकीहक्काते कागदपत्रे दिली नाहीत ती त्वरीत देऊन उर्वरीत पात्र कर्मचारी वर्गाला सुध्दा या योजनेचा लाभ त्वरीत देण्यात यावा. तसेच या घरांचे देखील नुतनीकरण करावे.
३.)सफाई कामगारांना १०, २० व ३० च्या लाभासाठी जी सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक अहर्ता घातली आहे ती रद्द करून यापुर्वी प्रमणेच ठेवावी.
४.)धन्वंतरी योजनेसाठी सफाई कामगारांना जी पैशाच्या भरणा हिस्सयावरून भेदभावाची वागणूक देऊन जनरल वार्ड ची सुविधा दिली जाते त्या एवजी त्याच स्वहिस्सा मध्ये सेमी रुम उपलब्ध करून हॉस्पिटलची संख्या वाढवावी.या सह अनेक मुद्दे उपस्थित केले.
वारसा हक्काच्या नियुक्ती विनाविलंब करा-
लाड-पागे समितीच्या वारस हक्काच्या नियुक्त्या साठी कर्मचारी वर्गाला नाहक त्रास दिला जातो,त्या संदर्भातील नियुक्त्या, धन्वंतरी योजना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना मधील अनेक त्रुटी व त्या संदर्भातील तक्रारी यावेळी राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर साहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर आयुक्त साहेब यांनी या संदर्भात पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येऊन कामगारांना न्याय देण्याचे काम केले जाईल.
गणेश भोसले,एकता कर्मचारी संघटना.

१०,२० व ३० च्या लाभासाठी पुर्वी प्रमाणे शैक्षणिक नियमावली ठेवा:-
सफाई कामगारांना सेवा प्रवेश नियम २०२० नुसार वाढीव शैक्षणिक व संगणकीय अहर्ता, अटी व शर्थी लादल्या असून त्या कर्मचारी वर्गासाठी जाचक व अन्यायकारक असून नियमबाह्य आहेत.यामुळे कर्मचारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.यासह अनेक कामगार हिताचे प्रश्न उपस्थित केले.यावर आयोगाचे माननीय अध्यक्ष शेरसिंग डागोर साहेब यांनी सकारात्मक चर्चा करून यावर लवकर तोडगा काडण्याचे आदेश आयुक्त यांना दिले आहेत.




































