पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १९- भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय गोरेगांव येथे दि. १८ ऑक्टोबर रोजी पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर माणगाव तालुक्यातील आणि गोरेगाव विभागातील नवीन युवकांचा भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. या पक्षप्रवेशांमध्ये चिंचवली येथील साईनाथ ढेपे, साहिल तपकिरे, यश पाटील, मुकेश मोरे, संकेत मोरे, मनोज तांबे, रोहित महाजन, गोरेगांव येथील मुरली कुलकर्णी, अक्षय मोरे, प्रथमेश मालगुडकर, वडपाले येथील निलेश कुंमकर, मारुती शिंदे या तरुणांनी पक्षप्रवेश केला.
हा प्रवेश सोहळा हा बापूसाहेब सोनगिरे, जिल्हा उपाध्यक्ष भालचन्द्र(नाना)महाले, माणगाव तालुका अध्यक्ष युवराज मुंढे, हरेश शेट, तालुका उपाध्यक्ष अशोक यादव, अनिकेत महामुणकर, सरचिटणीस प्रदिप गोरेगावकर, महिला मोर्चा अध्यक्षा प्रियांका मेहता, तालुका चिटणीस अनिल महाडिक, माजी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रितेश निवाते, गोरेगाव शहर अध्यक्ष किशोर रातवडकर, अनिल सत्वे, शंकर गुगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात युवा मोर्चा तालुका अध्यक्ष माणगाव मंदार महामुणकर,युवा मोर्चा गोरेगांव शहर अध्यक्ष यश मोने, युवा मोर्चा माणगाव तालुका चिटणीस आदित्य मोरे यांनी आयोजनात महत्वाचा सहभाग नोंदिविला. या बैठकीस आणि पक्ष प्रवेश समारंभास जिल्हा उपाध्यक्ष भालचन्द्र (नाना) महाले, माणगाव तालुका अध्यक्ष युवराज मुंढे, हरेश शेट, तालुका सरचिटणीस प्रदीप गोरेगावकर यांनी मार्गदर्शन केले. बापूसाहेब सोनगिरे यांनी सभेस मार्गदर्शन करताना पक्ष वाढीसाठी काय करायचे चे मार्गदर्शन करून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती माणगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी कामाला लागावे असे सांगीतले आहे.



































