पोलीस प्रवाह न्युज
पुणे, दि. २०- वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षांमध्ये विजय केळकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात पूर्वी नावाजलेला जगप्रसिद्ध आर्केस्ट्रा अशोक कुमार सराफ प्रस्तुत मेलोडी मेकर्स मध्ये गायक म्हणून सुरुवात केली. यानंतर त्यांनी मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रा सोबत देशा-विदेशामध्ये हजारो स्टेज शो ज केले. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये स्व, किशोर कुमार, म. रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, सुदेश भोसले, बेला सुलाखे, महेंद्र कपूर, कुमार सानु, साधना सरगम अशा भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज पार्श्वगायक पार्श्वगायिकांसोबत स्टेज शोज केले आहेत.
पुणे शहरातील अवघ्या महाराष्ट्रात सह देश विदेशात गाजलेले एक मोठे नाव विजय केळकर यांना व्हॉइस ऑफ किशोर कुमार म्हणून ओळखले जायचे. देश विदेशात मोठमोठ्या स्टेज शोला जेव्हा किशोर कुमार यांची गाणी गायचे तेव्हा पूर्ण थिएटर टाळ्या, शिट्ट्या आणि वन्स मोअर ने दुमदुमून जायचे. तसे ते अष्टपैलू गायक होते कोणत्याही गायकाची नक्कल ते त्यांच्या हूबे हूब आवाजात करत असत .
मागील वर्षी मेलडी मेकर्स आर्केस्ट्राला ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु, वयाच्या १७ व्या वर्षापासून पर्यंत विजय केळकर हे मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रा मध्ये गातात. वयाची सत्तरी पार करूनही तेवढ्याच ताकतीने गायन कला सादर करणाऱ्या अशा या अँग्री इन मॅन अष्टपैलू गायकाला उद्या पुणे येथील माय होम इंडिया व एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संगीत क्षेत्रात मौलिक दीर्घकालीन आणि प्रेरणादायी योगदान दिल्याबद्दल लता मंगेशकर स्वर सम्राज्ञी ” लता मंगेशकर ” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी मंगेशकर घराण्याचे नातू आदिनाथ मंगेशकर हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माय होम इंडियाचे कार्यकारी अधिकारी अभय थिटे यांनी दिलेली आहे.


































