पोलीस प्रवाह न्युज
कार्यकारी संपादक – परेश द. शिंदे
गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ‘श्री गणेशाय नम:’ म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही गणेशाचा नामोच्चार करतात. हा देव सकळ विघ्नांचा हर्ता व मंगलमूर्ती असा मानला जात असल्यामुळे या देवाचे पूजन सर्वांच्या घरी होते.
पार्वतीच्या अंगाच्या मळापासून गणपती निर्माण झाला अशी एक दंतकथा आहे. त्याप्रमाणे व्यासांनी सांगितलेलं महाभारत गणपतीने लिहिलं अशी समजूत आहे. अंगाने स्थूल, किंचित पिवळट वर्णाचा, मोठ्या पोटाचा, चार हात असलेला व एकदंत, हत्तीचं डोकं असलेला असं गणपतीचं रूप पुराणात वर्णिले आहे. त्याने आपल्या चारही हातात शंख, चक्र, गदा व पद्म ही आयुधं धारण केली आहेत. कधीकधी उंदराला आपलं वाहन करून त्यावर बसून चालला आहे. असंही गणपतीचं वर्णन आढळतं. गणपतीला हत्तीचं मस्तक का लागलं याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. अशा गणेशाचे स्थान भारतभर तसेच संपूर्ण जगभर अनेक ठिकाणी जागृत अवस्थेत दिसून येतात. त्यातील एक महान स्थान रायगडमध्ये माणगांव तालुक्यात मुगवली येथे स्वयंभू गणपती म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. दक्षिण रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव पासून तीन किलोमीटर अंतरावरील मुगवली फाट्या पासून अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर मुगवली गावाला लगत हे मंदिर आहे. हे मुगवली गाव शंभर-दीडशे घरांचे छोटे गाव आहे. लोकसंख्या ६०० ते ७०० आहे. कॅनलला लागूनच हे गाव आहे. मोठ्या प्रमाणात शेती सुद्धा या गावात केली जाते. या गावाला कॅनल आणि शेतीमुळे एक वेगळेच सौंदर्य रूप प्राप्त झालेला आहे. आणि या मंदिरामुळे या गावाची शोभा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

या गणेशाची महती अशाप्रकारे सांगितली जाते की, या स्वयंभू गणेश स्थानाची प्राचीन परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून सांगितली जाते. त्यापूर्वी हे जागृत गणेशाचे स्थान गुप्त अवस्थेत होते. सुमारे ३२५ वर्षांपूर्वी आपल्या शेतात एक तुकाराम शेतकरी नित्याप्रमाणे नांगरणी करीत होता. त्यावेळी अचानक जमिनीतला एक्का दगडास नांगराची फाळ लागून त्या दगडातून रक्त येऊ लागले ही घटनने मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी ही घटना आपल्या गावकऱ्यांना सांगितली ही वस्तुस्थिती पाहून गावकऱ्यांना जाणकारांचा सल्ला घेत जाणकारांनी हे गणेशाचे स्वयंभू स्थान असल्याचे सांगितले. सर्व गावकऱ्यांनी त्या पाषाणा भोवती ची जागा स्वच्छ केली त्यामुळे सर्वांनाच या श्रीगणेशाचे मोहक दर्शन घडले. सर्वांनी या गणेशाला मनोभावना वंदन केले व एक छोटासा मंदिर उभारला त्यावेळेपासून हा मुगवली चा गणेश प्रकट झाला व सर्वांची संकटे दूर करण्यास सज्ज झालेला आहे. तीस वर्षांपासून या गणेशाचे मंदिर अगदी छोटे होते. आसपासच्या हजारो भाविकांना त्याची प्रचीती येत आहे. हे गणेश देवता नवसाला पावतो अशी भाविकांची मोठी श्रद्धा असल्यामुळे पुणे, मुंबई तसेच अनेक ठिकाणाहून भक्तगण या गणेशाच्या दर्शनासाठी येत असतात. मुगवली मंदिरात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये गणेश उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो.
या जागृत मुगवली च्या गणेशाची मूर्ती जमिनीतून वर आलेली दोन फूट लांबी रुंदीच्या गोलाकार असलेल्या पाषाणावर नैसर्गिक अवस्थेत असून मस्तक उभी सोंड असून तेजस्वी डोळे गणेश ध्यान भाविकांना परम संतोष वाटते. हा गणेश सिंहासनाधिष्ट वाटतो. जणूकाही सिंहाला पाठ टेकून खाली पाय सोडून भक्तांना अभय व न्याय देण्यासाठी दरबारात बसला आहे. असे दृश्य दिसून येते या गणेशाचे नेत्र इतके तेजस्वी आहेत. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविक याकडे त्याचे लक्ष आहे असे जाणवते, अशी या मुगवलीच्या गणेशाची महती सांगण्यात येते.



































