पोलीस प्रवाह न्युज
महाड, दि. १- महाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचा एक जून रोजी चा वाढदिवस मोठ्या उत्साह व जल्लोषात साजरा झाला. या वाढदिवसाला सामाजिक सोहळ्याचे स्वरूप आले होते. रायगड जिल्ह्यातील तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून भोगावले यांच्या चाहत्यांनी आज महाड येथील ढालकाटी या त्यांच्या निवासस्थानी या सोहळ्याची अलोट गर्दी पाहण्यासारखी होती. या सोहळ्याला आलेली गर्दी म्हणजे त्यांच्या लाखोच्या त्यांनी दिलेला उदंड प्रतिसाद असल्याची प्रतिक्रिया या सोहळ्यासाठी जमलेल्या गोगावले समर्थकांकडून व्यक्त केली जात होती.
वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश, शुभेच्छा स्वीकारतच सामान्यांसाठी अनोखे उपक्रम. मंत्री भरत गोगावले यांच्या निवासस्थानी हजारो नागरिकांची शुभेच्छांसाठी काल रात्रीपासूनच त्यांच्या निवासस्थानी अलोट गर्दी पाहण्यास मिळाली. महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादनमंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थान ‘शिवनेरी’ येथे आज दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी हजारो नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. वाढदिवसानिमित्त संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी सामाजिक बांधिलकी जपत निलेश सांबरे यांच्या जिजाऊ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंत्री महोदयांच्या हस्ते मोफत आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर तसेच गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मोफत वही व शैक्षणिक साहित्याचेही वितरण करण्यात आले. राज्याचे फलोत्पादन मंत्री भरतगोगावले यांच्यावाढदिवसाच् औचित्य साधून दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत करून मंत्री महोदयांनी सामाजिक संवेदनशीलतेचा परिचय दिला. तसेच मतदारसंघातील आणि परिसरातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबांनाही आर्थिक सहाय्य देण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका सौ. मीनल संजय तुर्डे, संजय तुर्डे आणि मदन तुर्डे यांच्या वतीने नागरिकांना साखरेचे वाटप करण्यात आले.
सामाजिक उपक्रम, जनसामान्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सेवाभावी दृष्टिकोन यामुळे मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसाला यंदा एक वेगळे सामाजिक स्वरूप प्राप्त झाले असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.












































