पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ३- आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी पक्षांतर करत आहेत. माणगाव तालुक्यातील महत्वाचा समजला जाणारा मोर्बा जिल्हा परिषद मतदारसंघात, सुर्ले गाव, महादपोली, डोंगरोली आदिवासी वाडी, साई मोहल्ला, साई कोंड येथील विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युवा नेते राकेश पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्य रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री ना. भरत गोगावले यांच्या उपस्थितीत दि. ३ नोव्हेंबर रोजी माणगाव येथे शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला.
या प्रवेशकर्त्यामध्ये, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उबाठा या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस राकेश पवार, सुर्ले गाव माजी अध्यक्ष नरेंद्र मालुसरे, ॲड अनंत जाधव, दिनेश पवार, लक्ष्मण जाधव, विकी तांबे, अनिरूद्ध खैरे, आदित्य मोरे, राज मोरे, सम्यक साळवी, यश शिर्के, रुपेश जाधव, प्रथमेश शिर्के, संकेत जाधव, निरज कोळी, संजय कोळी, संदीप काटकर, अजय कोळी, राज साळवी, विजय कोळी, कुंदन कुंदेकर, निकेश साळवी या सुर्ले, पवारवाडी, महादपोली, डोंगरोली आदिवासी वाडी या गावातील ग्रामस्थांनी तर साई मोहल्ला, साई कोंड या गावातील दिपेश जंगम, उबेद जुवळे, अजय अधिकारी, अब्दल्ला सोलकर, संकेत अडखळे, शादाब माटवणकर, रिहान खेरटकर, मेहमूद दळवी, साद दळवी, जुनेद खेरटकर, अब्दल्ला कोंडविलकर, सलमान राहटविलकर, उजेर जुवळे, फरीद सोलकर, संकेत बामणे, हुसेन आंबेरकर आदी ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
यावेळी ना. भरत गोगावले यांच्या समवेत जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका प्रमुख ॲड. महेंद्र मानकर, शिवसेना माणगाव शहर प्रमुख नितीन दसवते, शहर संपर्क प्रमुख प्रसाद धारिया, युवासेना शहर प्रमुख सौरभ खैरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अविनाश नलावडे, उप तालुका प्रमुख प्रशांत अधिकारी व शिवसेना युवासेना विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रवेशकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश करताना सांगितले की, आम्ही आमचे युवा नेते राकेश पवार यांच्या नेतृत्वाखाली ना. भरत गोगावले जी विकासकामे करत आहेत त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करीत आहोत. आमच्या विभागात शिवसेना पक्ष बळकट करून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करू असे सांगितले.




































