पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १९- रायगड जिल्ह्यासह माणगाव तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी करत पक्षप्रवेशाचा धडका सुरू केला. असाच एक पक्षप्रवेश माणगाव तालुक्यातील साळवे गावातील ग्रामस्थ आणि मुंबईकर ग्रामस्थांचा दि. १२ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पार पडला. यामध्ये शिवसनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ना. आदिती तटकरे, मा. आ. अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली निजामपूर विभाग राष्ट्रवादी जेष्ठ नेते चंद्रशेखर (बाबुशेठ) खानविलकर, निजामपूर विभाग राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शैलेश खांडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेला विकास डोळ्यासमोर ठेवून साळवे ग्रामस्थ आणि मुंबईकर ग्रामस्थ यांनी प्रसाद गुरव, शिवाजी घाग, किशोर तोंडलेकर, शैलेश दाखिणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.
यामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश तेटगुरे, मुंबई अध्यक्ष विष्णू तेटगुरे, मुंबई उपाध्यक्षनामदेव तेटगूरे, मुंबई सेक्रेटरी बळीराम तेटगुरे, मुंबई उपसेक्रेटरी सुभाष तेटगुरे, मुंबई खजिनदार तुकाराम शिंदे, उपखजिनदार नथुराम तेटगूरे, सहअध्यक्ष रोहिदास तेटगुरे, मनोज तेटगुरे त्यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी अजित पवार गट मध्ये प्रवेश केला आहे.



































