पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १२- रायगड जिल्ह्यासह माणगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रायगड जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहचला आहे. खा. सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री ना. आदिती तटकरे, मा. आ. अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन, पक्ष प्रवेश व नव पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये माणगाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असणाऱ्या तळाशेत जिल्हा परिषद गणात मौजे चेरवली गावचे सुपुत्र नितीन खडतर यांची माणगाव तालुका सह चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कै. शांतराम खडतर यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेत नितीन खडतर विविध माध्यमातून गेली अनेक वर्ष खरवली पंचक्रोशीत समाजकार्य करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व विविध कंपनींच्या सी. एस. आर. फंडातून नितिन खडतर यांनी विविध सामाजिक उपक्रम व विकासकामे केली आहेत. पंचक्रोशी सहित माणगाव तालुक्यात त्यांना सामाजिक सलोखा तळागाळापर्यंत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर नवीन जबाबदारी देत त्यांची माणगाव तालुका सह चिटणीस पदी नियुक्ती केली आहे. हे नियुक्ती पत्र खा. सुनील तटकरे, ना. आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना देण्यात आले.
यावेळी नितीन खडतर म्हणाले की, खा. सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री ना. आदिती तटकरे, मा. आ. अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यात विकासकामांचा झंझावात सुरू आहे. खरवली पंचक्रोशीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. कै. बाबुराव भोनकर, कै. शांताराम खडतर यांच्या आशीर्वादाने खा. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून चेरवली गावात ६८ कोटीच्या धरणाचे काम सुरू असून त्यामुळे खरवली पंचक्रोशीतील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून याचा फायदा विभागातील शेतकऱ्यांना होणार आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत पक्ष वाढीसाठी व संघटना मजबूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत करू, असे सांगितले.


































